ईव्ही आगीची सर्वात मोठी घटना, नाशिकमध्ये 20 इलेक्ट्रिक स्कूटरला आग

इलेक्ट्रिक स्कूटरला आग का लागते?
electric scooters from jitendra ev catch fire in nashik
electric scooters from jitendra ev catch fire in nashikDainik Gomantak
Published on
Updated on

इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत, त्यामुळे आता इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षेचा विषय चर्चेत आला आहे. वृत्तानुसार, नाशिकमध्ये (Nashik) आज (11 एप्रिल) जितेंद्र इलेक्ट्रिक व्हेइकल्सच्या 40 इलेक्ट्रिक स्कूटरना एका ट्रान्सपोर्ट कंटेनरमध्ये भरल्यानंतर आग लागली. जितेंद्र ईव्ही फॅक्टरीजवळ ही घटना घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्कूटर बेंगळुरूला नेल्या जात होत्या आणि कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. दुसऱ्या एका अहवालानुसार आग लागलेल्या वाहनांची संख्या 20 आहे. आगीचे मूळ कारण शोधण्यासाठी तपास सुरू असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

electric scooters from jitendra ev catch fire in nashik
दमदार स्मार्टफोन फक्त 399 मध्ये, 5000mAh बॅटरीसह अनेक वैशिष्ट्ये

दरम्यान, 7 एप्रिल रोजी, सरकारने ओला इलेक्ट्रिक (Electric) आणि ओकिनावा स्कूटर्सना त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर्समध्ये नुकत्याच लागलेल्या आगीबद्दल स्पष्टीकरणासाठी तपास करण्याचा निर्णय घेतला. इलेक्ट्रिक स्कूटर आणि ओकिनावा इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याची घटना समोर आली आहे, त्यानंतर अनेक ग्राहक चिंतेत पडले आहेत आणि आता इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

इलेक्ट्रिक स्कूटरला आग का लागते?

ईव्ही आगीबाबत सरकार (government) गंभीर आहे आणि ओला आणि ओकिनावा स्कूटरला लागलेल्या आगीबाबत कंपनीकडून आधीच उत्तर मागितले आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीम सध्या याचा तपास करत असून, स्वतंत्र तपास पूर्ण झाल्यानंतर दोन्ही कंपन्यांच्या तांत्रिक पथकांना बोलवण्यात येणार आहे. त्यानंतर यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com