Fine On SBI: दोन मोठ्या सरकारी बँकांसह 'या' खाजगी बँकेला RBI चा दणका! नियमांचे उल्लघन, ठोठावला करोडोंचा दंड

Fine On Canara Bank: आरबीआयने स्पष्टपणे सांगितले आहे की, नियामक अनुपालनातील त्रुटींसाठी हा दंड ठोठावण्यात आला आहे. बँक आणि ग्राहक यांच्यातील व्यवहार किंवा कराराशी त्याचा काहीही संबंध नाही.
RBI has imposed a penalty of Rs 3 crore on  SBI and Canara Bank and City Union Bank.
RBI has imposed a penalty of Rs 3 crore on SBI and Canara Bank and City Union Bank.Dainik Gomantak

Fine On SBI, Canara Bank and CITI Union Bank by RBI:

भारतीय रिझर्व्ह बँकेने खाजगी क्षेत्रातील सिटी युनियन बँकेसह एसबीआय आणि कॅनरा बँक या दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना 3 कोटी रुपयांचा मोठा दंड ठोठावला आहे.

या बँकांवरील नियामक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

आरबीआयने सांगितले की, ठेवीदार एज्युकेशन अवेअरनेस फंड स्कीम, 2014 शी संबंधित काही नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल एसबीआयला 2 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

वृत्तानुसार, याशिवाय सिटी युनियन बँक लिमिटेडला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या उत्पन्नाची ओळख, मालमत्ता वर्गीकरण आणि कर्ज संबंधित तरतुदी, अनुत्पादित कर्जासंबंधीच्या तरतुदींचे पालन न केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. सिटी युनियन बँकेला 66 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

तर काही निर्देशांचे पालन न केल्याबद्दल RBI ने कॅनरा बँकेला 32.30 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

RBI has imposed a penalty of Rs 3 crore on  SBI and Canara Bank and City Union Bank.
AI टूल्सवर भारतीयांचा सर्वात जास्त विश्वास, माणसांपेक्षा AI शी बोलण्यात अधिक रस

दुसरीकडे, नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांशी (NBFC) संबंधित काही तरतुदींचे पालन न केल्याबद्दल ओडिशातील राउरकेलाच्या ओशन कॅपिटल मार्केट्स लिमिटेडला 16 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आरबीआयने स्पष्टपणे सांगितले आहे की, नियामक अनुपालनातील त्रुटींसाठी हा दंड ठोठावण्यात आला आहे. बँक आणि ग्राहक यांच्यातील व्यवहार किंवा कराराशी त्याचा काहीही संबंध नाही.

RBI has imposed a penalty of Rs 3 crore on  SBI and Canara Bank and City Union Bank.
Vijay Shekhar Sharma Steps Down: विजय शेखर शर्मा यांनी दिला पेटीएम पेमेंट बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा; बोर्ड सदस्यत्वही सोडले

याशिवाय, सरकारने नोंदणीकृत व्यवसायांचा डेटा रिझर्व्ह बँकेच्या 'पब्लिक टेक प्लॅटफॉर्म फॉर फ्रिक्शनलेस क्रेडिट' सोबत नोंदणीकृत व्यवसायांच्या संमतीने देवाण-घेवाण करण्याची परवानगी GST नेटवर्कला दिली आहे.

या निर्णयामुळे वस्तू आणि सेवा कर (GST) शी संबंधित सामायिक केलेल्या माहितीच्या आधारे व्यवसाय युनिट्सना जलद कर्ज मिळण्यास मदत होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com