होळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सरकार डीएमध्ये 3 टक्क्यांनी वाढ करणार असून 1 जानेवारी 2022 पासून याची अमंलबजावणी होणार आहे. यासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार जानेवारी आणि फेब्रुवारीच्या थकबाकीसह वाढीव पगार कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात देण्यात येणार आहे. (The Inflation Allowance DA Of Central Government Employees Is likely To Increase Before Holi)
महागाई भत्ता 34 टक्के असेल
सध्या एकूण महागाई भत्ता 31 टक्के आहे, जो घोषणेनंतर 34 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. महागाई (Inflation) भत्ता 34 टक्के झाला तर पगारात 20 हजार रुपयांची वाढ होऊ शकते. 7व्या केंद्रीय वेतन आयोगाअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए मूळ वेतनाच्या आधारावर निश्चित केला जातो. ऑक्टोबरमध्ये 3 टक्के आणि जुलैमध्ये 11 टक्क्यांनी वाढल्यानंतर सध्याचा डीए दर 31 टक्क्यांवर गेला आहे.
पगार आणि पेन्शनचा मोठा भाग
महागाई भत्ता हा कर्मचार्यांच्या पगाराचा आणि पेन्शनधारकांच्या पेन्शनचा एक प्रमुख भाग आहे. हा भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनावरील महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी दिला जातो. 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत (7वा CPC), सरकार वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये DA मध्ये वाढ देते. सरकारी कर्मचार्यांच्या ठिकाणांनुसार DA बदलतो.
48 लाख कर्मचाऱ्यांना फायदा
अहवालानुसार, जर सरकारने पगारवाढीची घोषणा केली तर त्याचा फायदा भारतातील सुमारे 48 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना होईल. गेल्या वर्षी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 28 टक्क्यांवरुन 31 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आला होता. कोरोना महामारीचं संकट असूनही या कर्मचाऱ्यांना डीएमध्ये वाढ देण्यात आली. मात्र, यासंदर्भात सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.