खूशखबर ! केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार 300 सुट्या; 'Labour Code' मध्ये होणार बदल

मोदी सरकार (Modi Government) 1 ऑक्टोबरपासून कामगार संहितेचे (Labor Code) नवे नियम लागू करु शकते.
Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आनंदात भर पाडणारी एक बातमी आहे. मोदी सरकार (Modi Government) एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये असून सरकारी कर्मचाऱ्यांना 1ऑक्टोबरपासून 300 सुट्ट्या मिळण्याची शक्यता आहे. मोदी सरकार 1 ऑक्टोबरपासून कामगार संहितेचे (Labor Code) नवे नियम लागू करु शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुट्टया 240 हून 300 पर्यंत वाढू शकतात, असे सांगण्यात येत आहे. मोदी सरकार 1 एप्रिल 2021 पासून लेबर कोडमधील नव्या नियमांची अंमलबजावणी करणार होते परंतु काही राज्यांची (States) यासाठी तयारी नसल्यामुळे आणि एचआर पॉलिसीमध्ये फेरबदल करण्यासाठी वेळ दिल्याने ते पुढे ढकलण्यात आले होते. कामगार सहिंतेमधील नियमांत नवे बदल करण्याबाबत केंद्रीय कामगार मंत्रालय (Union Ministry of Labor), कामगार संघटना आणि उद्योग जगतातील प्रसिध्द नामवंतांशी चर्चा करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.

1ऑक्टोबरपासून लागू होणार नवी कामगार संहिता ?

1जुलैपासून लेबर कोडमधील नवे नियम लागू होणार होते मात्र राज्यांनी पुन्हा एकदा वेळ वाढवून मागितला आहे. त्यामुळे आता 1 ऑक्टोबरपर्यंत केंद्र सरकारने वेळ वाढवून दिला आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासून केंद्र सरकार कामगार मंत्रालयाच्या मदतीन कामगार संहितेचे नवे नियम लागू करणार असल्याची शक्यता आहे. वार्षीक सुट्ट्या, कामाचे तास, पेन्शन, पीएफ, टेक होम सॅलरी, सेवानिवृत्तीस या घटकांवर चर्चा करण्यात आली आहे. यावेळी कर्मचाऱ्यांनी अर्जित रजांमध्ये 240 वरुन 300 पर्यंत वाढ करण्याची मागणी केली होती.

Prime Minister Narendra Modi
भारतीयांची स्विस बॅंकेत 20 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम?; मोदी सरकार म्हणाले..

दरम्यान, या नव्या नियमांना आणि कामगार संघटनेच्या मागण्यांना मोदी सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. तर 1 ऑक्टोबर 2021 पासून कर्मचाऱ्यांच्या 300 अर्जित रजा मिळणार असल्याची शक्यता आहे. ऑगस्ट 2019 मध्ये संसदेने कामगार संहिता, इंडस्ट्रीयल रिलेशन, कामाची सुरक्षा, हेल्थ एन्ड वर्किंग कन्डीशन आणि सामाजिक सुरक्षततेशी संबंधित नियमांमध्ये बदल करण्यात आले. हे नियम सप्टेंबर 2022 मध्ये मंजूर करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com