केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर; 'या' बचत निधींवरती मिळणार व्याज

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, केंद्र सरकारच्या कर्मचारी गट विमा योजना, CGEGIS-1980 च्या बचत निधीवर सरकारने नवीन व्याजदराची घोषणा केली आहे.
Central Government
Central GovernmentDainik Gomantak
Published on
Updated on

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, केंद्र सरकारच्या (Central Government) कर्मचारी गट विमा योजना, CGEGIS-1980 (Central Government Employees Group Insurance Scheme) च्या बचत निधीवर सरकारने नवीन व्याजदराची घोषणा केली आहे, नवीन व्याजदर जानेवारी ते मार्च 2022 पर्यंत लागू असणार आहे.

Central Government
खुशखबर! आयटी कंपन्या मार्चपर्यंत 3.6 लाख नवीन नोकऱ्या करणार निर्माण

भारत सरकारचे (Government of India) उपसचिव बीके मंथन यांच्या मते, CGEGIS बचत निधी अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी ते मार्च 2022 दरम्यान 7.1 टक्के व्याज मिळणार. सरकारने ती ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीच्या समान ठेवली आहे. हा व्याजदर IRDAI ने निश्चित केला होता पण केंद्र सरकारने तो स्वतःच्या अधिकारात लागू करण्याचा निर्णय घेतला.

एजी ऑफिस ब्रदरहुड, अलाहाबादचे माजी अध्यक्ष एचएस तिवारी यांनी माध्यमांना सांगितले की, जेव्हा एखादी व्यक्ती सरकारी सेवेत रुजू होते, तेव्हा त्याला CGEGIS अंतर्गत घेतले जाते. या योजनेत दोन प्रकारचे निधी आहेत- विमा निधी (Insurance fund) आणि बचत निधी (Savings Fund). सरकारी सेवेदरम्यान, मासिक योगदानाचा एक भाग बचत निधीमध्ये जमा केला जातो, ज्यावरती तुम्हाला व्याज मिळते. या योजनेंतर्गत सरकारी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला त्या विम्याचा लाभ मिळतो.

Central Government
'या' सरकारी योजनेद्वारे करा भविष्य सुरक्षित, यांना मिळणार 3000 रुपये पेन्शन

सरकारकडून, मासिक योगदानाचा एक भाग बचत निधीमध्ये जमा केला जातो आणि त्यामध्ये व्याजाची पूर्तता केली जाते, या योजनेंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालास कुटुंबाला त्याचा लाभ मिळतो.

गट D: 10 10000

गट C: 20 20000

गट ब: 40 30000

गट A: 80 40000

एचएस तिवारी यांच्या म्हणण्यानुसार, 1 जानेवारी 1990 पासून योगदानाच्या रकमेत 50 टक्क्यांपर्यंतची वाढ करण्यात आली आहे.

Central Government
तुम्हाला माहीतीये का व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फीचर

एचएस तिवारी यांच्या मते, CGEGIS मधील 70 टक्के रक्कम बचत निधीमध्ये जात असते, तर 30 टक्के रक्कम विमा निधीमध्ये जाते. परंतु 1 जानेवारी 1990 पासून हे प्रमाण बदलून 75:25 एवढे करण्यात आले आहे. त्याच वेळी, बचत निधीवरील व्याज दर, 2017 पासून प्रत्येक तिमाहीत निश्चित केले जातात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com