Tata Group: टाटा समूहाच्या 'या' कंपनीला मिळाली एवढ्या कोटींची ऑर्डर, शेअर्स बनले रॉकेट!

Tata Group Latest News: टाटा समूहाच्या या कंपनीला 7,492 कोटी रुपयांची मोठी ऑर्डर मिळाली असून, त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी आली आहे.
Ratan Tata
Ratan TataDainik Gomantak
Published on
Updated on

Tata Group News: टाटा समूहाची कंपनी तेजस नेटवर्क्सच्या शेअर्समध्ये आज मोठी तेजी दिसून आली. टाटा समूहाच्या या कंपनीला 7,492 कोटी रुपयांची मोठी ऑर्डर मिळाली असून, त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी आली आहे.

तेजस नेटवर्क वायरलेस नेटवर्किंग उत्पादने तयार करते. तेजस नेटवर्कला टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कडून 7,492 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे.

शेअर्स 5 टक्क्यांनी वाढले

या बातमीनंतर तेजस नेटवर्कचा शेअर 7 टक्क्यांनी वाढून 866 च्या पातळीवर पोहोचला. याशिवाय, कंपनीचे शेअर्स अजूनही 5 टक्क्यांच्या वाढीसह 850 च्या पातळीवर व्यवहार करत आहेत. 20 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 52 आठवड्यांसाठी 893.30 च्या विक्रमी पातळीवर होते.

Ratan Tata
Tata Group नं कर्मचाऱ्यांना केलं मालामाल, पगारात भरघोस वाढ; 16 ते 62 टक्क्यांनी...!

TCS सोबत करार

तेजस नेटवर्कने BSNL च्या संपूर्ण भारतातील 4G/5G नेटवर्कसाठी रेडिओ एक्सेस नेटवर्क (RAN) उपकरणांचा पुरवठा, सपोर्ट आणि वार्षिक देखभाल सेवांसाठी TCS सोबत करार केला आहे.

कंपनीच्या स्टॉकने किती परतावा दिला?

जर कंपनीच्या शेअर्सबद्दल बोलायचे झाल्यास, गेल्या 6 महिन्यांत कंपनीने गुंतवणूकदारांना (Investors) 33.19 टक्के परतावा दिला आहे. या कालावधीत शेअर 211.80 रुपयांनी वाढला आहे. त्याचवेळी, कंपनीचा स्टॉक YTD वेळेत 40.17 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. याशिवाय या कंपनीने गेल्या वर्षभरात 75.62 टक्के परतावा दिला आहे.

Ratan Tata
Tata Group: पैसे तयार ठेवा! 18 वर्षानंतर टाटा ग्रृपचा बाजारात धडकणार IPO, कमाई करण्याची मोठी संधी

तेजस नेटवर्क कशामध्ये काम करते

तेजस नेटवर्क 75 पेक्षा जास्त देशांमध्ये वायरलेस उत्पादन, वायरलेस नेटवर्किंग उत्पादने, दूरसंचार सेवा प्रदाते, इंटरनेट सेवा प्रदाते, वायरलेस नेटवर्किंग उत्पादने, संरक्षण आणि सरकारी संस्थांमध्ये गुंतलेले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com