Tata Group: पैसे तयार ठेवा! 18 वर्षानंतर टाटा ग्रृपचा बाजारात धडकणार IPO, कमाई करण्याची मोठी संधी

Tata Group: कंपनीचे शेअरहोल्डर आणि प्रमोर्टर्स 9.57 करोड शेअर विकणार असल्याची माहीती समोर आली आहे.
Tata Group
Tata Group Dainik Gomantak

Tata Group: रतन टाटांनी उभारलेला टाटा ग्रृप गुंतवणूकदारांना मोठी संधी देत आहे. जर तुम्ही आयपीओमध्ये गुंतवणूक करणार असाल तर किंवा तसा विचार करत असाल तर गुंतवणूक करुन नफा मिळवण्याची तुमच्यासाठी एक महत्वाची आणि मोठी संधी असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

टाटा मोटर्सचा भाग असलेली कंपनी टाटा टेक्नॉलीजीजने आयपीओ लॉच करण्यापूर्वी सेबीकडे ( SEBI ) ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट दिले आहे.

टाटा टेक्नॉलॉजीज चा हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल( OFS ) साठी असणार आहे. याअतंर्गत कंपनीचे शेअरहोल्डर आणि प्रमोर्टर्स 9.57 करोड शेअर विकणार असल्याची माहीती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टाटा मोटर्सचे टाटा टेक्नॉलॉजीजमध्ये 74 टक्क्यांची हिस्सेदारी आहे.

Tata Group
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोल -डिझेलचे भाव काय? जाणून घ्या आजचे दर

जवळजवळ 18 वर्षानंतर टाटा ग्रृप आयपीओ लॉंच करत आहे. याआधी 2004 मध्ये टाटा( Tata ) ग्रृपची आयटी कंपनी टाटा कंसल्टंसी सर्व्हीसेस आयपीओ बाजारात आली होती. आता टाटा टेक्नॉलॉजीज लवकरच बाजारात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com