'फेविकोल का मजबूत जोड़ है, टूटेगा नहीं...' शिपाई म्हणून काम करणारा माणूस कसा झाला 8 हजार कोटींच्या कंपनीचा मालक

Fevicol: एक जर्मन कंपनी Hoechst त्याच्या संपर्कात आली. बळवंतराय पारेख यांना जर्मनीला जाण्याची संधी मिळाली. तिथे ते खूप गोष्टी शिकले. बळवंत पारेख जर्मनीहून परतले आणि त्यांनी भावासोबत डायकेम इंडस्ट्रीज नावाची कंपनी सुरू केली.
Success story Of Balwant Rai Parekh Fevicol
Success story Of Balwant Rai Parekh FevicolDainik Gomantak

Success story Of Balwant Rai Parekh Fevicol:

एकेकाळी लाकडाच्या वखारीत शिपाई म्हणून काम करणारे फेविकॉलचे संस्थापक बळवंत राय पारेख गरिबीमुळे कुटुंबासह त्याच ठिकाणी राहत होते.

मात्र, जिद्द, कष्ट आणि चिकाटीमुळे पारेख यांनी उद्योग जगतात असा चमत्कार घडवला की, आज, त्यांच्या पिडीलाइट कंपनीच्या फेविकॉल ब्रँडची दररोज 29 कोटी रुपयांची आणि दर तासाला 1 कोटी रुपयांची आणिएका वर्षात 1 लाख कोटी रुपयांची विक्री होते.

बळवंत पारेख यांच्या पिडीलाइट कंपनीचे आजचे बाजार मूल्य १.२८ लाख कोटी रुपये आहे.

जाणून घेऊया कोण आहेत बळवंतराय पारेख आणि त्यांची पिडीलाइट कंपनी.

'फेविकॉल मॅन ऑफ इंडिया'

1925 मध्ये गुजरातच्या भावनगर जिल्ह्यातील महुआ शहरात जन्मलेले बलवंतराय कल्याणजी पारेख, पिडीलाइट इंडस्ट्रीज या फेविकॉलची निर्मिती करणाऱ्या कंपनीचे संस्थापक होते.

त्यांनी कायद्याची पदवी मिळवली पण त्या क्षेत्रात काम केले नाही. त्याऐवजी ते मुंबईतील एका रंगकाम आणि मुद्रणालयात काम करू लागले.

यानंतर तो एका लाकूड व्यापार्‍याच्या कार्यालयात शिपाय म्हणून काम करू लागले, जिथे ते आपल्या पत्नीसह गोदामात राहिले.

बळवंतराय यांना स्वतःचा व्यवसाय करायचा होता, म्हणून मोहन नावाच्या गुंतवणूकदाराच्या मदतीने त्यांनी पाश्चिमात्य देशांतून सायकली, सुपारी आणि कागदी रंग आयात करण्याचा व्यवसाय सुरू केला.

आपल्या जिद्दिच्या आणि कष्टाच्या जोरावर बळवंतराय यांनी कंपनीला हजारो, लाखो कोटींच्या शिखरावर नेऊन ठेवले आहे.

वयाच्या 88 व्या वर्षी 2013 मध्ये बळवंतराय पारेख यांनी अखेरचा श्वास घेतला.

Success story Of Balwant Rai Parekh Fevicol
रोजंदारीवर काम करणारी कल्पना सरोज बनली हजारो कोटींची मालकीण; जाणून घ्या

अशी झाली फेव्हिकॉलची सुरुवात

दरम्यान, एक जर्मन कंपनी Hoechst त्याच्या संपर्कात आली. बळवंतराय पारेख यांना जर्मनीला जाण्याची संधी मिळाली. तिथे ते खूप गोष्टी शिकले. बळवंत पारेख जर्मनीहून परतले आणि त्यांनी भावासोबत डायकेम इंडस्ट्रीज नावाची कंपनी सुरू केली.

त्यांची कंपनी मुंबईच्या जेकब सर्कलमध्ये रंग, औद्योगिक रसायने, रंगद्रव्य इमल्शन युनिटचे उत्पादन आणि व्यापार करत होती.

त्यांनी जंगलात बराच वेळ घालवला होता. लाकूड चिकटवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते हे त्यांनी पाहिले होते. म्हणून त्यांनी गोंद बनवायला सुरुवात केली. ज्याला फेविकॉल असे नाव देण्यात आले.

Success story Of Balwant Rai Parekh Fevicol
Success Story: 48 तसांत उभारली 500 कोटींची कंपनी! गोष्ट मुंबईच्या मध्यमवर्गीय कुटुंबातील सुमितची

आज कुठे आहे पिडिलाइट कंपनी

पिडिलाइट इंडस्ट्रीज सध्या अमेरिका, ब्राझील, थायलंड, इजिप्त, बांगलादेश, दुबईमध्ये देखील कार्यरत आहे.

बीएसईनुसार, सध्या पिडीलाइट इंडस्ट्रीजची उलाढाल 5.34 कोटी रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप 1,09,729.04 कोटी रुपये आहे. आणि BSE वर शेअरची किंमत रु 2158.75 आहे.

2021-22 या आर्थिक वर्षात Pidilite चा महसूल 8,340.17 कोटी रुपये होता.

पिडीलाइटच्या उत्पादनांबद्दल सांगायचे तर, त्यामध्ये फेविकॉल व्यतिरिक्त फेविकिक, डॉ. फिक्सिट, एमसील, फेविकॉल मरीन, फेविकॉल एसएच, फेविकॉल स्पीड एक्स, फेविकॉल स्प्रे, फेविकॉल फ्लोरिक्स, फेविकॉल फोमिक्स इत्यादींचा समावेश आहे. पिडिलाइटच्या 2013 पर्यंत 14 उपकंपन्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com