रोजंदारीवर काम करणारी कल्पना सरोज बनली हजारो कोटींची मालकीण; जाणून घ्या

अशीच एक काहीशी कहाणी आहे, विदर्भातील रहिवासी असलेल्या कल्पना सरोजची (Kalpana Saroj).
Kalpana Saroj
Kalpana SarojDainik Gomantak

तुमच्या मनात एखादी गोष्ट करण्याची जिद्द असेल, हिंमत असेल आणि आत्मविश्वास असेल तर एक स्त्री असूनही तुम्ही सर्वात मोठं काम करु शकता. अशीच काहीशी कहाणी आहे, विदर्भातील रहिवासी असलेल्या कल्पना सरोजची. जी आता मुंबईत अनेक कंपन्यांच्या मालकीण बनली आहे. कल्पना सरोज सांगितले की, माझे लहान वयातच लग्न झाले. वडील पोलीस खात्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते. कधी लग्न होणार, कुणाच्या घरी लग्न करुन जाणार कळत नव्हतं. मात्र मुलगा मुंबईचा आहे म्हणून माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मला मुंबईला पाठवण्यात आले. परंतु इथे आल्यावर मला झोपडपट्टीत राहावे लागले. दरम्यान घरगुती हिंसाचार सर्रासपणे होत होता.

माहेरी राहणे ही आवडत नव्हते

कल्पना सरोज यांनी सांगितले की, माझे वडील एकदा मुंबईत आले तेव्हा त्यांनी आपल्या मुलीची अशी अवस्था पाहिली तेव्हा त्यांनी मला काही दिवस आपल्यासोबत घरी घेऊन आले. मात्र मी सासरहून आल्यामुळे माहेरी राहणे मला आवडत नव्हते. तसेच माहेरी आल्याने सतत समाजाचे टोमणेही सहन करावे लागत असत. त्यामुळे मी अस्वस्थ होते, कल्पना पुढे सांगतात की, मी एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला होता परंतु वडीलांनी वाचवले. मला आयुष्यात काय करावं हे समजत नव्हतं.

Kalpana Saroj
परमबीर सिंग यांच्या अटकेला सर्वोच्च न्यायालयाने दिली स्थगिती

नोकरीच्या शोधात पुन्हा मुंबई गाठली

कल्पना सरोज यांनी पुन्हा एकदा विदर्भातून मुंबईत येण्याचा प्लॅन केला. यावेळी मला तर नोकरीच्या शोधात मुंबईत यायचे होते. कुटुंबाचा विरोध असतानाही मी मुंबईत आले. इथे राहण्यासाठी एका नातेवाईकाचा आधार मिळाला आणि मग मी एका होजायरी कंपनीत कामाला सुरुवात केली, असल्याचेही कल्पना सरोज यांनी सांगितले. दरम्यान पहिल्यांदा कल्पना यांनी शिवणकाम सुरु केले, काही पैसे जमवले, तर कल्पनाला अजून खूप काम करायचे होते. दरम्यान, वडिलांच्या नोकरीत काही अडचण आल्याने त्यांनी आपल्या बहिणीला आणि आई-वडिलांनाही गावावरुन मुंबईला बोलावले. मुंबईपासून दूर कल्याणमध्ये स्वतः भाड्याच्या घरात राहायला सुरुवात केली.

एक बुटीक सुरु केले

कल्पना सरोज पुढे सांगतात की, मी एक बुटीक सेंटर उघडण्याची योजना आखली. 50000 चे सरकारी कर्जही घेतले. त्यातून बुटीकचे काम सुरु केले. परंतु त्यादरम्यान बहिणीची तब्येत इतकी बिघडली त्यातच तिचा मृत्यू झाला. त्या दिवसापासून कल्पनाने ठरवले की, पैशांअभावी मी आपल्या बहिणीवर उपचार करु शकले नाही. त्या दिवसानंतर कल्पनाने आपल्या कामात प्रगतीचा नवा उच्चांक गाठण्यास सुरुवात केली. आज त्या हजारो कोटींची मालकीण बनल्या.

Kalpana Saroj
परमबीर सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

बिल्डर म्हणून ओळख

कल्पना पुढे सांगतात की, मी बुटीकचे काम सुरु केले, 'कामाची सुरुवात चांगली झाली. नंतर हळूहळू मी प्रॉपर्टीच्या व्यवसायात प्रयत्न करायला सुरुवात केली. मी ठरवले की, या मुंबई शहरात स्वतःची ओळख बिल्डर म्हणून निर्माण करायची.' पुढे त्यांनी काही घरे बांधण्याची योजना आखली, कोर्टाच्या फेऱ्यात अडकलेली जमीन कायदेशीररित्या जिंकली आणि तिथे इमारत बांधण्याचे काम चालू केले. यादरम्यान कल्पना पुढे सांगतात की, अनेक शत्रू माझ्या समोर उभे होते. त्यामुळे सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या.

कमानी ट्यूब लिमिटेड कंपनीचा प्रवास

कल्पना पुढे सांगितात की, त्याच काळात मी एका संस्थेची स्थापना देखील तयार केली होती, ज्यामध्ये उमद्या तरुण तरुणींना जोडण्यास सुरुवात केली. दरम्यान, कल्पनाची ओळख तिच्या वाढत्या कामामुळे होऊ लागली. लोक तिला एका धाडसी महिलेच्या नावाने ओळखू लागले, तेव्हाच असे काही कामगार तिच्याकडे आले जे मुंबईच्या कमानी ट्यूब लिमिटेड नावाच्या कंपनीत काम करायचे. दरम्यान ही कंपनी पूर्णपणे बुडाली होती. कंपनी कशी उभी राहू शकते यासाठी त्यांनी कल्पनाकडे मदत मागितली. त्यासाठी कल्पना यांनी त्या कंपनीतील सर्व कर्मचारी आणि युनियनशी बोलणेही केले. त्याच काळात न्यायालयाचा दरवाजाही ठोठावला आणि या कंपनीशी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी पुढे येण्याचे ठरवले. कल्पना पुढे सांगतात की, कमानी ट्यूब कंपनीवर त्यावेळी 100 हून अधिक खटले होते. कंपनीवर बरेच कर्जही होते.

दरम्यान, कल्पना यांनी कोर्टात धाव घेतली. काही अटींसह कोर्टाने त्यांना कंपनीचे संचालक बनवले. ही कंपनी सुरु करण्याची जबाबदारी कल्पना यांच्यावर होती. त्या कंपनीचे कर्ज आणि खटले सोडवण्यात अनेक वर्ष गुंतल्या होत्या. शेवटी 2011 मध्ये, कंपनीची सर्व कर्जे आणि खटले संपले आणि कल्पना कमानी ट्यूब लिमिटेडची संचालक बनल्या. तिथून कल्पना सरोजच्या चांगल्या दिवसांचा प्रवास सुरु झाला.

सरकार आणि समाजानेही कल्पना सरोज यांच्या मेहनतीचे आणि समर्पणाचे कौतुक केले. कल्पनाला देश-विदेशातून पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना भारत सरकारचा पद्मश्रीही मिळाला आहे. आज कल्पना सरोज या तमाम महिलांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. ज्यांच्यात आत्मविश्वास असेल, हिंमत असेल तर त्या जीवनात स्त्री असूनही सर्वात मोठे स्थान मिळवू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com