India Population: 12 वर्षात भारतात ब्राझील एवढ्या लोकसंख्येच्या लोकांचा जन्म, लवकरच देश होणार 'नंबर वन'

मागील एक वर्षापासून, देशात सध्या किती लोक आहेत याबाबत आकडेवारी उपलब्ध नाही.
India Population
India PopulationDainik Gomantak
Published on
Updated on

India Population: भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या दिशेने वाटचाल करत आहे. येत्या दोन महिन्यांत, भारत 1.4 अब्ज लोकसंख्येसह जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सध्या जगातील सर्वाधिक लोकसंख्या चीनमध्ये असून, भारत लवकरच त्याला मागे टाकण्याच्या तयारीत आहे.

पण, मागील एक वर्षापासून, देशात सध्या किती लोक आहेत याबाबत आकडेवारी उपलब्ध नाही.

(India soon to be world's most populous nation. Country has added 210 millions population in last 12 years)

India Population
Chetan Sharma Sting Operation: चेतन शर्मावर बीसीसीआय अ‍ॅक्शन घेणार? नवी अपडेट समोर

भारतात दर दहा वर्षांनी एकदा जनगणना केली जाते, 2021 मध्ये देशाची जनगणना होणार होती पण, कोरोना साथीच्या आजारामुळे याला उशीर झाला. दरम्यान, जनगणना प्रक्रियेत आता तांत्रिक आणि लॉजिस्टिक अडथळा निर्माण झाला आहे. तसेच, सध्या तरी जनगणना होईल अशी कोणती शक्यता दिसत नाही.

'रोजगार, गृहनिर्माण, साक्षरता, स्थलांतर पद्धती आणि बालमृत्यू यांसारखा डेटा अद्ययावत करण्यात होणारा विलंब आशियाई अर्थव्यवस्थेतील सामाजिक आणि आर्थिक नियोजन आणि धोरणनिर्मितीवर परिणाम करतो.' असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

India Population
Panjim: तो रस्त्यावर झोपून दिवस काढायचा... अखेर बेघर युवकाला पणजी पोलिसांनी दिला मदतीचा हात

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसीच्या फेलो रचना शर्मा म्हणाल्या की, खर्चाचे सर्वेक्षण आणि श्रमशक्ती सर्वेक्षण जनगणनेच्या माहितीवर आधारित अंदाज आहेत. त्यामुळे जनगणनेचा डेटा "अपरिहार्य" आहे. असे त्यांनी म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रांनी 14 एप्रिल रोजी भारताची लोकसंख्या 1,425,775,850 पर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. भारत लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकेल.

2011 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 1.21 अब्ज इतकी होती. 12 वर्षांत भारतात 210 दशलक्ष म्हणजेच जवळजवळ ब्राझीलच्या लोकसंख्येएवढी भर घातली आहे. 3 लाख 30 हजार शिक्षक घरोघरी जात जनगणना करतात. 16 भाषेत अकरा महिने ही प्रक्रिया सुरू असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com