SpiceJet: स्पाइसजेटने चुकवले 100 कोटींचे कर्ज, कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल एवढ्या टक्क्यांची वाढ!

SpiceJet Share Price: स्वस्तात विमानसेवा देणाऱ्या स्पाईसजेट या कंपनीने सिटी युनियन बँकेचे सुमारे 100 कोटी रुपयांचे कर्ज फेडले आहे.
SpiceJet
SpiceJetDainik Gomantak

SpiceJet Share Price: स्वस्तात विमानसेवा देणाऱ्या स्पाईसजेट या कंपनीने सिटी युनियन बँकेचे सुमारे 100 कोटी रुपयांचे कर्ज चुकवले आहे.

स्पाईसजेटने एका निवेदनात म्हटले आहे की, जूनमध्ये या कर्जाचा शेवटचा हप्ता म्हणून 25 कोटी रुपये परत केले गेले आहेत.

यासोबतच कर्जाच्या बदल्यात बँकेकडे तारण ठेवलेल्या सर्व मालमत्ताही परत करण्यात आल्या आहेत. शेवटचा हप्ता 30 जून रोजी देण्यात आल्याचे एअरलाइन्सने सांगितले.

2012 मध्ये कर्ज घेतले होते

यासोबतच कंपनीने माहिती देताना सांगितले की, 2012 मध्ये घेतलेल्या 100 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करण्यात आली आहे.

स्पाइसजेटला (SpiceJet) गेल्या काही महिन्यांत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला आहे. त्याच्या काही कर्जदारांनी त्याच्याविरुद्ध दिवाळखोरीची प्रक्रिया सुरु करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय भाडेतत्त्वावर विमाने देणाऱ्या काही कंपन्यांनीही त्यांची विमाने परत घेण्याचा इशारा दिला आहे.

SpiceJet
दिल खूश कर दित्ता! SpiceJet ने वैमानिकांच्या पगारात केली बंपर वाढ, मुंबई-गोवा प्रवास करणाऱ्यांसाठी...

कंपनीचा शेअर 12.44 टक्क्यांनी वाढला

तसेच, या सेटलमेंटच्या वृत्तानंतर शेअर्समध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. स्पाईसजेटचा शेअर आज बीएसईवर 12.44 टक्क्यांनी वाढला आहे. आजच्या वाढीनंतर कंपनीचा शेअर 30.64 रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे.

विमान कंपनीने माहिती दिली

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा कंपनी बँकेकडून कर्ज घेत होती, तेव्हा तिने प्रवर्तकांचे 2 कोटी शेअर्स गहाण ठेवले होते.

माहिती देताना, एअरलाइनने म्हटले आहे की, नॉर्डिक एव्हिएशन कॅपिटल (एनएसी) सोबत यशस्वी समझोता करारानंतर हे कर्ज सिटी युनियन बँकेला दिले गेले आहे. स्पाईसजेटच्या Q400 विमानांसाठी NAC एक प्रमुख भाडेकरार आहे.

SpiceJet
SpiceJet च्या सिस्टीमवर सायबर हल्ला; एअरलाइन्सने ट्विट करत दिली माहिती

प्रत्येक मार्गाचे भाडे वाढले आहे

कंपनी प्रवाशांना (Passengers) भाड्यातही सवलत देऊ शकते, अशी शक्यता आहे. गेल्या काही काळात विमान कंपन्यांच्या तिकिटांमध्ये मोठी वाढ झाली आहे. जवळपास प्रत्येक मार्गाच्या भाड्यात सुमारे 50 ते 300 टक्के वाढ झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com