SpiceJet च्या सिस्टीमवर सायबर हल्ला; एअरलाइन्सने ट्विट करत दिली माहिती

स्पाइसजेटवर सायबर हल्ल्यामुळे एअरलाइन्सच्या यंत्रणा प्रभावित झाल्या, ज्यामुळे त्यांचे कामकाज मंदावले होते.
SpiceJet Airline News | Cyber ​​Attacks on SpiceJet System
SpiceJet Airline News | Cyber ​​Attacks on SpiceJet System Dainik Gomantak

मंगळवारी रात्री विमान कंपनी स्पाइसजेटवर सायबर हल्ला झाला आहे. या सायबर हल्ल्यामुळे एअरलाइन्सच्या यंत्रणा प्रभावित झाल्या, ज्यामुळे त्यांचे कामकाज मंदावले होते. बुधवारी सकाळी स्पाइसजेटच्या (SpiceJet) काही फ्लाइटवरती परिणाम झाला आहे. एअरलाईन्सने या संदर्भात ट्विट करून ही माहिती दिली आहे. मात्र, एअरलाइनच्या म्हणण्यानुसार आता यावर नियंत्रण आणण्यात आलेले आहे. (Cyber ​​attacks on SpiceJet system The airlines tweeted the information)

SpiceJet Airline News | Cyber ​​Attacks on SpiceJet System
गोव्यातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घ्या

स्पाईसजेटने ट्विट केले की आमच्या काही प्रणालींना काल रात्री रॅन्समवेअर हल्ल्याच्या प्रयत्नांना सामोरे जावे लागले आहे. ज्याचा आज सकाळच्या उड्डाणांवरती परिणाम झाला आहे. ही परिस्थिती आमच्या आयटी टीमने नियंत्रणात आणलेली आहे. एअरलाइन्सची उड्डाणे आता सामान्यपणे सुरू झालेली आहेत.

स्पाइसजेट वर झालेला हा रॅन्समवेअर सायबर हल्ला आहे. तर हा वायरस यूजर कंप्यूटवर सर्व गोष्टी कंट्रोल करत असून तो पैश्यांची डिमांड करत आहे. तो वायरस कंप्यूटरच नाही तर मोबाईलला सुद्धा नुकसान पोहचवू शकतो.

रॅन्समवेअर तुमच्या माहितीशिवाय कंप्यूटवर किंवा स्मार्टफोनला हानी पोहोचवणारे सॉफ्टवेअर डाउनलोड करते, आणि ज्याद्वारे ते वापरकर्त्यांची माहिती एन्क्रिप्ट करते. तर हॅकर युजरचा सर्व डेटा ऍक्सेस करू शकतो. हॅकर वापरकर्त्याचा डेटा ब्लॉक करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचा देखील प्रयत्न करतो. बिटकॉइन तसेच डॉलरपर्यंत शुल्काच्या स्वरूपात वापरकर्त्याकडून पेमेंटची मागणी केली जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com