दिल खूश कर दित्ता! SpiceJet ने वैमानिकांच्या पगारात केली बंपर वाढ, मुंबई-गोवा प्रवास करणाऱ्यांसाठी...

SpiceJet Pilots Salary: बजेटमध्ये विमानसेवा देणाऱ्या स्पाईसजेट विमान कंपनीने वैमानिकांच्या (कॅप्टन) पगारात वाढ केली आहे.
SpiceJet Pilots Salary
SpiceJet Pilots SalaryDainik Gomantak
Published on
Updated on

SpiceJet Pilots Salary: बजेटमध्ये विमानसेवा देणाऱ्या स्पाईसजेट विमान कंपनीने वैमानिकांच्या (कॅप्टन) पगारात वाढ केली आहे. 75 तासांच्या उड्डाणासाठी वैमानिकांचा पगार दरमहा 7.5 लाख रुपये करण्यात आल्याचे एअरलाइनच्या वतीने सांगण्यात आले.

नवीन वेतन 16 मे 2023 पासून लागू होईल. नोव्हेंबर 2022 मध्ये, विमान कंपनीने 80 तासांच्या उड्डाणासाठी वैमानिकांचे मासिक वेतन 7 लाख रुपये केले होते.

75 तासांच्या विमान प्रवासासाठी 7.5 लाख रुपये पगार

विमान कंपनीने वैमानिकांसाठी पोस्ट लिंक्ड लॉयल्टी पुरस्कारही जाहीर केला आहे. प्रशिक्षणार्थी आणि फर्स्ट ऑफिसर्सच्या पगारातही वाढ करण्यात आली आहे. एअरलाइन्सने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 75 तासांच्या उड्डाणासाठी वैमानिकांचे मासिक वेतन 7.5 लाख रुपये करण्यात येत आहे.

एअरलाइनने त्यांच्या वैमानिकांसाठी प्रति महिना 1 लाख रुपयांपर्यंतच्या कार्यकाळाशी संबंधित मासिक लॉयल्टी बक्षिसे जाहीर केली. हे त्याच्या मासिक मानधनाच्या व्यतिरिक्त असेल.

SpiceJet Pilots Salary
Go First नंतर आणखी एक एअरलाइन्स अडचणीत, SpiceJet वर टांगती तलवार

ग्राहकांसाठी खास ऑफर

स्पाइसजेटने (SpiceJet) 18 व्या वर्धापनदिनानिमित्त आपल्या ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. ऑफर अंतर्गत, प्रवाशांना फक्त 1818 रुपयांमध्ये फ्लाइट बुक करण्याची संधी मिळत आहे. विमान कंपनीने नियमित प्रवाशांसाठी ही खास ऑफर आणली आहे.

एअरलाइनने वनवे डोमेस्टिक फेअर स्पेशल सेल जाहीर केला आहे. तुम्ही या ऑफरचा लाभ बेंगळुरु-गोवा आणि मुंबई-गोवा मार्गांवर घेऊ शकता. यासाठी 23 ते 28 मे पर्यंत तिकीट बुक करु शकता.

SpiceJet Pilots Salary
SpiceJet Emergency Landing: गोव्याहून येणाऱ्या स्पाईसजेट विमानाचे हैदराबादमध्ये आपत्कालीन लँडिंग

तसेच, स्पाइसजेटच्या एम-साइट किंवा मोबाइल अॅपद्वारे तिकीट बुक करताना प्रवासी अतिरिक्त फायदे घेऊ शकतात. स्पाइसजेट 2023 मध्ये 18 वर्षांचे किंवा 18 वर्षांचे होणार्‍या प्रवाशांना 3,000 रुपयांचे मोफत फ्लाइट व्हाउचर देत आहे.

या मेगा सेलमध्ये प्रवासी (Passengers) त्यांच्या आवडत्या सीटचा फ्लॅट रु.18 मध्ये बुक करु शकतात. तसेच तुम्हाला SpiceMax कडून 50% सूट मिळू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com