OnePlus Pad Price: वन प्लस पॅडसोबत स्मार्ट टीव्ही लॉन्च, किंमत घ्या जाणून...

इव्हेंटमध्ये अनेक उत्पादने केली लाँच, दमदार फीचर्स
OnePlus Pad Price
OnePlus Pad PriceDainik Gomantak

OnePlus Pad Price: OnePlus कंपनीने त्यांच्या Cloud 11 इव्हेंटमध्ये अनेक नवी उत्पादने लॉन्च केली आहेत. कंपनीने यात दोन स्मार्टफोनसह टीव्ही, टॅब्लेट आणि इअरबड्स लॉन्च केले आहेत.

कंपनीने आपला पहिला टॅबलेट 65 इंच स्क्रीन आकाराच्या टीव्हीसह सादर केला आहे. यासोबतच ब्रँडने वायरलेस कीबोर्डही सादर केला आहे.

OnePlus Pad Price
Earthquake Zones in India: भारतात 'या' 8 राज्यांना आहे भुकंपाचा सर्वाधिक धोका... जाणून घ्या भूकंपप्रवण क्षेत्रे

OnePlus Pad आणि TV सोबत कंपनीने इतर अनेक उत्पादने देखील लॉन्च केली आहेत. वनप्लस पॅड चुंबकीय कीबोर्ड आणि स्टाईलससह येतो. कंपनीने अधिक चांगले हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरसह आपला नवीन टीव्ही लॉन्च केला आहे.

कंपनीने OnePlus 11 5G सोबत OnePlus 11R आणि OnePlus Buds Pro 2 देखील लॉन्च केला.

किंमत किती?

कंपनीने OnePlus Pad लाँच केला असला तरी तो आता लगेच उपलब्ध होणार नाही. ग्राहक एप्रिलमध्ये प्री-ऑर्डर करू शकतील. कंपनीने त्याची किंमतही जाहीर केलेली नाही. तर OnePlus TV 65 Q2 Pro 99,999 रुपये किंमतीत लॉन्च केला आहे.

त्याची प्री-ऑर्डर 6 मार्चपासून सुरू होईल आणि 10 मार्चला टीव्हीची विक्री सुरू होईल. याशिवाय कंपनीने Keyboard 81 Pro ची किंमतही जाहीर केलेली नाही.

OnePlus Pad Price
Turkey Earthquake: तुर्कीच्या भुगर्भात नेमकं चाललंय तरी काय? देश 10 फूट खचला...

वनप्लस पॅडची वैशिष्ट्ये

हा ब्रँडचा पहिला टॅबलेट आहे. यात 11.61-इंचाचा डिस्प्ले आहे, जो 144Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. टॅबलेट MediaTek Dimensity 9000 चिपसेटवर काम करतो. यात 12GB पर्यंत रॅमचा पर्याय मिळेल. OnePlus टॅबलेट 5G सपोर्टसह येतो.

यात 9,510mAh बॅटरी आहे, जी 67W चार्जिंगला सपोर्ट करेल. यात 13MP सिंगल रियर आणि 8MP फ्रंट कॅमेरा आहे.

OnePlus TV 65 Q2 Pro ची वैशिष्ट्ये

या टीव्हीमध्ये 65-इंचाचा QLED डिस्प्ले, जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येईल. त्याची कमाल ब्राइटनेस 1200 Nits आहे. टीव्हीमध्ये 70W 2.1 चॅनेल साउंडबार उपलब्ध असेल. वाय-फाय सपोर्ट असलेले टीव्ही Android टीव्हीवर आधारित OxygenPlay 2.0 वर काम करतील. तुम्ही ते इतर OnePlus उपकरणांशी देखील कनेक्ट करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com