सणासुदीच्या आधी SBI ने दिली भेट, आता जानेवारी 2024 पर्यंत मिळणार 'ही' खास सुविधा!

SBI Car Loan: बँकेने आपल्या ग्राहकांसाठी सणासुदीच्या हंगामात (SBI Festive Season) एक ऑफर आणली आहे, ज्यामध्ये कार लोन घेणाऱ्यांना आतापासून कोणतेही प्रक्रिया शुल्क भरावे लागणार नाही.
SBI Bank
SBI BankDainik Gomantak
Published on
Updated on

State Bank of India: एसबीआय आपल्या ग्राहकांना वेळोवेळी अनेक सुविधा देत आहे. आता तुम्हीही कार घेण्याचा विचार करत असाल तर स्टेट बँकेने ग्राहकांना एक खास भेट दिली आहे.

बँकेने आपल्या ग्राहकांसाठी सणासुदीच्या हंगामात (SBI Festive Season) एक ऑफर आणली आहे, ज्यामध्ये कार लोन घेणाऱ्यांना आतापासून कोणतेही प्रक्रिया शुल्क भरावे लागणार नाही.

आतापासून, कार लोन घेणारे ग्राहक कित्येक हजार रुपयांची बचत करु शकतात. सणासुदीच्या काळात बँकेने हा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती एसबीआयने ट्विट करुन दिली आहे.

एसबीआयने ट्विट केले आहे

एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'यावेळी तुम्ही तुमचा सणासुदीचा सीझन आणखी आनंदी बनवू शकता. तुम्ही तुमच्या स्वप्नातील कार खरेदी करु शकता.''

ऑफर 31 जानेवारीपर्यंत वैध आहे

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या मते, फेस्टिव्हल ऑफर अंतर्गत कार लोनवर ग्राहकांकडून (Customer) प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही. SBI वेबसाइटनुसार, ही ऑफर 31 जानेवारी 2024 पर्यंत वैध आहे.

SBI Bank
Online Payment: UPI वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी! SBI ने लागू केली 'ही' सुविधा

बँक आता कोणत्या दराने कर्ज देते?

एसबीआयकडून वाहन कर्जावर एक वर्षाचा MCLR जारी केला जातो. सध्या तो 8.55 टक्के आहे. जर बँकेने कोणत्याही ग्राहकाला कार लोन दिले तर त्यावर किमान 8.55 टक्के व्याज आकारले जाईल. सध्या SBI कार लोन 8.80 टक्के ते 9.70 टक्के आहे. SBI लोनवरील व्याजदर ग्राहकाच्या CIBIL स्कोअरनुसार ठरवले जातात.

SBI Bank
State Bank of India FD Scheme: SBI ने ग्राहकांना पुन्हा दिली खूशखबर, 'या' योजनेत आता जबरदस्त फायद्यांसह...

कार लोनसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतील?

>>गेल्या 6 महिन्यांचे बँक अकाऊंट तपशील

>> पासपोर्ट आकाराचे 2 फोटो

>> रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक असेल

>> वेतन स्लिपसह फॉर्म-16

>> मागील 2 वर्षांचे आयटीआर रिटर्न

>> पासपोर्ट, पॅन कार्ड (PAN Card), मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com