Online Payment: UPI वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी! SBI ने लागू केली 'ही' सुविधा

Online Payment: देशात ऑनलाइन पेमेंट करण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आजकाल लोक व्यवहार फक्त ऑनलाइन माध्यमातून करत आहेत.
Online Payment
Online PaymentDainik Gomantak

Online Payment: देशात ऑनलाइन पेमेंट करण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आजकाल लोक व्यवहार फक्त ऑनलाइन माध्यमातून करत आहेत. यामध्ये लोकांना UPI द्वारे ऑनलाइन पेमेंट करण्याची सुविधाही मिळाली आहे.

UPI व्यवहार करणाऱ्या लोकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. यातच आता, SBI कडून एक महत्वाची घोषणा देखील करण्यात आली आहे, ज्याबद्दल लोकांना जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.

एसबीआय

वास्तविक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने सांगितले की, त्यांनी डिजिटल रुपयामध्ये 'UPI इंटरऑपरेबिलिटी' लागू केली आहे. त्याच्या डिजिटल रुपयाला सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) म्हणतात.

एसबीआयने जारी केलेल्या निवेदनानुसार, या पाऊलाद्वारे बँकेचे आपल्या ग्राहकांना (Customers) अभूतपूर्व सुविधा आणि सुलभता प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे.

Online Payment
Online Payment Fraud: ऑनलाइन फसवणूक झाल्यास काय कराल? जाणून घ्या सविस्तर माहिती

SBI द्वारे ई-रुपी

दरम्यान, ग्राहकांना ही अत्याधुनिक सुविधा 'ई-रुपी बाय एसबीआय' अॅपद्वारे उपलब्ध होणार आहे. ग्राहक कोणताही UPI QR कोड सहजपणे 'स्कॅन' करु शकतील आणि कोणत्याही अडचणीशिवाय पेमेंट करु शकतील.

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या डिजिटल ई-रुपी प्रोजेक्टमध्ये सहभागी होणाऱ्या काही बँकांपैकी SBI ही एक आहे.

UPI व्यवहार

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) नेटवर्कने ऑगस्ट 2023 मध्ये दरमहा 1,000 कोटी व्यवहारांचा टप्पा पार केला आणि विक्रमी 1,058 व्यवहार केले. मे 2023 मध्ये, प्लॅटफॉर्मने दरमहा 900 कोटी व्यवहार पार केले होते.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या डेटानुसार, व्यवहारांची संख्या मागील महिन्याच्या तुलनेत 6.2 टक्के अधिक होती आणि ऑगस्ट 2022 च्या तुलनेत 61 टक्के जास्त होती.

Online Payment
QR Code Payment Risk : क्यूआर कोडवरून पेमेंट करत असाल तर थांबा! अन्यथा सहन करावे लागेल मोठे नुकसान

व्यवहार रक्कम

व्यवहार मूल्याच्या बाबतीत, UPI प्लॅटफॉर्मने महिन्याभरात ₹15.76 लाख कोटी व्यवहारांच्या नवीन विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला. व्यवहाराची रक्कम महिन्या-दर-महिन्याच्या तुलनेत 2.7 टक्के आणि मागील वर्षाच्या तुलनेत 47 टक्क्यांनी वाढली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com