SBI क्रेडिट कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! 1 डिसेंबरपासून बदलणार नियम; पेट्रोल-डिझेल आणि ट्रान्सपोर्ट पेमेंटवर भरावा लागणार अतिरिक्त चार्ज

SBI Credit Card Rule Change: SBI क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
SBI Credit Card Rule Change
SBI Credit Card Rule ChangeDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

SBI क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तुम्ही पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी किंवा प्रवास आणि वाहतुकीशी संबंधित मोठ्या व्यवहारांसाठी क्रेडिट कार्डचा वापर करत असाल, तर डिसेंबर महिन्यापासून तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. कारण, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्ड विभागाने (SBI Card) काही विशिष्ट व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवीन नियम 1 डिसेंबर 2026 पासून लागू होणार आहेत. त्यामुळे नियमितपणे मोठ्या रकमेचे व्यवहार करणाऱ्या कार्डधारकांनी या बदलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

ट्रान्सपोर्ट व्यवहारांवर 1 टक्के अतिरिक्त शुल्क

नवीन नियमांनुसार, SBI क्रेडिट कार्डद्वारे करण्यात येणारा पात्र ट्रान्सपोर्ट व्यवहार 30 हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास ग्राहकांना 1 टक्के अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे. विशेष म्हणजे, हे शुल्क संपूर्ण महिन्यातील व्यवहारांची एकत्रित रक्कम पाहून आकारले जाणार नाही. तर प्रत्येक पात्र व्यवहार स्वतंत्रपणे तपासला जाणार आहे.

यामध्ये विशिष्ट मर्चंट कॅटेगरी कोड म्हणजेच MCC 4111, 4784 आणि 4131 अंतर्गत येणाऱ्या काही वाहतूक सेवांशी संबंधित व्यवहारांचा समावेश आहे. उदाहरणार्थ, एखाद्या ग्राहकाने क्रेडिट कार्डद्वारे 35 हजार रुपयांचे पात्र ट्रान्सपोर्ट पेमेंट केले, तर त्याला 350 रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागू शकते. त्याचप्रमाणे 50 हजार रुपयांच्या व्यवहारावर 500 रुपये शुल्क आकारले जाऊ शकते. त्यामुळे मोठ्या रकमेचे प्रवास किंवा वाहतूकविषयक पेमेंट करणाऱ्यांना या बदलाचा परिणाम जाणवू शकतो.

SBI Credit Card Rule Change
Goa Politics: 'मनोज परब प्रसिद्धीसाठी धडपडत आहेत'; विजय सरदेसाईंचा आरजीपी नेत्याला टोला

पेट्रोल-डिझेलच्या खर्चावरही बसणार अतिरिक्त भार

क्रेडिट कार्डधारकांसाठी दुसरा महत्त्वाचा बदल इंधन व्यवहारांशी संबंधित आहे. पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी कार्डचा वापर करणाऱ्या ग्राहकांना आता बिलिंग सायकलमधील एकूण पात्र फ्यूल खर्चावर लक्ष ठेवावे लागणार आहे.

नवीन नियमानुसार, एका बिलिंग सायकलमध्ये पात्र फ्यूल व्यवहारांची एकत्रित रक्कम 50 हजार रुपयांच्या पुढे गेल्यास 1 टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते. उदाहरणार्थ, एखाद्या ग्राहकाने महिन्याच्या बिलिंग कालावधीत पेट्रोल आणि डिझेलसाठी एकूण 55 हजार रुपये खर्च केले, तर 1 टक्क्याप्रमाणे 550 रुपये अतिरिक्त शुल्क लागू होऊ शकते. त्यामुळे वाहनांचा व्यावसायिक वापर करणारे किंवा इंधनावर नियमितपणे मोठी रक्कम खर्च करणाऱ्या ग्राहकांनी या नियमाची विशेष नोंद घ्यावी.

SBI Credit Card Rule Change
Goa Politics: गोवा फॉरवर्डसोबत युतीच्या चर्चेला दिल्‍लीत सकारात्मक वळण, काँग्रेसचा सावध आशावाद; पुढील बैठक निर्णायक

क्रेडिट कार्ड वापरताना कोणती काळजी घ्यावी?

1 डिसेंबरपासून हे बदल लागू होणार असल्याने ग्राहकांनी आपल्या क्रेडिट कार्डचा वापर करताना व्यवहारांचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. विशेषतः ट्रान्सपोर्टसाठी 30 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेचा व्यवहार करण्यापूर्वी संभाव्य शुल्काचा विचार करावा. तसेच फ्यूलसाठी महिनाभरात किती खर्च झाला आहे, याचा नियमित आढावा घ्यावा.

याशिवाय, ग्राहकांनी SBI Card कडून जारी करण्यात आलेल्या अधिकृत नियमावलीची माहिती घ्यावी. आपल्या कार्डचा प्रकार, लागू असलेले शुल्क आणि उपलब्ध रिवॉर्ड पॉइंट्स यांची तुलना करून खर्चाचे नियोजन करणे फायदेशीर ठरू शकते. क्रेडिट कार्डचा वापर करताना केवळ मिळणारे रिवॉर्ड किंवा सवलती न पाहता त्यावर आकारले जाणारे अतिरिक्त शुल्कही लक्षात घेणे आता आवश्यक ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.