Samsung Galaxy M34 5G : दोन दिवस टिकेल इतकी बॅटरी, 50 मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा...जाणून घ्या सॅमसंगच्या नव्या फोनमध्ये काय आहे खास?

M34 5G Launch: फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. त्याचा पहिला सेन्सर 50 मेगापिक्सेलचा असेल. दुसरा 8 मेगापिक्सेलचा आणि तिसरा 2 मेगापिक्सेलचा आहे.
Samsung Galaxy M34 5G
Samsung Galaxy M34 5G Dainik Gomantak
Published on
Updated on

Samsung Galaxy M34 5G Launch In India:

दक्षिण कोरियाची स्मार्टफोन निर्माता कंपनी सॅमसंगने आज आपल्या M सीरीजमधील एक नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. या फोनचे नाव Samsung Galaxy M34 5G आहे.

या फोनच्या लॉन्चपूर्वीच याबाबत ग्राहकांमध्ये उत्सुकता होता. फोनमध्ये 8 जीबी रॅम असेल. यासोबतच Android 13 आणि ट्रिपल रियर कॅमेरा देखील असणार आहे. या फोनची किंमत सुमारे 16,999 रुपये पासून पुढे असणार आहे.

Samsung Galaxy M34 5G
फ्लिपकार्ट-अ‍ॅक्सिस बँक देणार 30 सेकंदात Personal Loan; वाचा संपूर्ण प्रक्रिया

या फोनमध्ये 6.5-इंचाचा फुल HD AMOLED डिस्प्ले असेल. हा फोन कंपनीच्या Exynos 1280 चिपसेटने सुसज्ज आहे. यामध्ये 8 GB पर्यंत रॅम आणि 128 GB स्टोरेज असणार आहे.

फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. त्याचा पहिला सेन्सर 50 मेगापिक्सेलचा असेल. दुसरा 8 मेगापिक्सेलचा आणि तिसरा 2 मेगापिक्सेलचा आहे.

फोनमध्ये 13-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर दिला आहे. हा फोन Android13 वर काम करेल. हा फोन दोन प्रकारात लॉन्च केला असून पहिल्या प्रकारात 6 GB RAM आणि दुसऱ्या प्रकारात 8 GB RAM चा समावेश आहे.

Samsung Galaxy M34 5G
केंद्र सरकारची 'युनिटी मॉल' संकल्पना नेमकी काय आहे? गोवा सरकारकडून जागेचा शोध सुरू

Samsung Galaxy M34 5G वैशिष्ट्ये

120Hz सुपर AMOLED डिस्प्ले.

सेल्फी कॅमेऱ्यासाठी U-आकाराचा नॉच.

6,000 mAh बॅटरी जी एका चार्जिंगमध्ये 2 दिवस टिकू शकते.

व्हिडिओंसाठी OIS सह 50 मेगापिक्सेलसह ट्रिपल कॅमेरा प्रणाली.

हा फोन निळा, जांभळा आणि गुलाबी यासह तीन रंग प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com