फ्लिपकार्ट-अ‍ॅक्सिस बँक देणार 30 सेकंदात Personal Loan; वाचा संपूर्ण प्रक्रिया

Personal Loan in 30 Seconds: कर्जाच्या मंजुरी प्रक्रियेला फक्त 30 सेकंद लागतील अशी अपेक्षा आहे, ज्यामुळे ग्राहकांना सोप्या पद्धतीने कर्ज उपलब्ध होणार आहे.
Axis Bank
Axis Bank Dainik Gomantak

Personal Loan in 30 Seconds: भारतातील ई-कॉमर्स मार्केटप्लेस Flipkart ने, आपल्या 450 दशलक्ष ग्राहकांना सुविधा आणि फायदे तसेच पर्सनल लोनची उपलब्ध करुन देण्यासाठी, खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या Axis बँकेसोबत भागीदारी केली आहे.

नव्याने सादर करण्यात आलेली पर्सनल लोन सेवेद्वारे ग्राहकांना 5 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते. ग्राहकांना ते फेडण्यासाठी 6 ते 36 महिन्यांपर्यंतचा कालावधी मिळणार आहे.

भारतीय ग्राहकांचा जसाजसा विकास होत आहे, तसतसे त्यांची जीवनशैली सुधरवण्याची इच्छा वाढत आहे. Flipkart आणि Axis Bank ने ग्राहकांचा हा प्रश्न सुलभ करण्यासाठी डिजिटल-फर्स्ट सोल्यूशन्स शोधले आहेत.

पर्सनल लोन सुविधा ग्राहकांची खर्च करण्याची क्षमता वाढवेल. Flipkart ने पे लेटर, प्रॉडक्ट फायनान्सिंग, सेलर फायनान्सिंग, क्रेडिट कार्ड्स आणि पर्सनल लोनमध्ये विस्तार यासह ग्राहकांना अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.

बँकिंग संस्थांसोबत धोरणात्मक सहकार्याद्वारे, आम्ही आमच्या ग्राहकांना सक्षम केले आहे. आम्‍हाला आता अ‍ॅक्सिस बँकेच्‍या सहकार्याने पर्सनल लोन सेवा सादर करताना आनंद होत आहे. हे आर्थिक उपाय ग्राहकांच्या विकसनशील मागण्या पूर्ण करतात, त्यांच्या खरेदी प्रवासादरम्यान अधिक लवचिकता आणि सुविधा देतात. आमची बांधिलकी ऑनलाइन शॉपिंग लँडस्केपला आकार देणे, सर्वांसाठी सुलभता आणि सर्वसमावेशकता सुनिश्चित करणे आहे.
धीरज अनेजा: उपाध्यक्ष, Fintech आणि Payments Group
Axis Bank
ऑनलाइन गेमिंग, कॅसिनो, हॉर्स रेसिंगवरील GST वाढणार? गोव्याचा विरोध, GoM बैठकीकडे लक्ष

असे मिळवा 30 सेकंदात कर्ज

ग्राहकांना त्यांच्या कर्जाची मंजुरी केवळ ३० सेकंदात मिळेल. यासाठी ग्राहकांनी अर्जासह पॅन कार्ड, जन्मतारखेचा पुरवा आणि कामाचे तपशीलाचे पुरावे सादर करणे आवश्यक आ

एकदा हे तपशील प्रदान केल्यानंतर, अ‍ॅक्सिस बँक त्यांची कर्ज मर्यादा मंजूर करेल. त्यानंतर ग्राहक त्यांच्या सोयीस्कर मासिक परतफेडीची क्षमता लक्षात घेऊन त्यांच्या पसंतीची कर्जाची रक्कम आणि परतफेडीची पद्धत निवडू शकतात.

Flipkart कर्जाचा अर्ज अंतिम करण्यापूर्वी पुनरावलोकनासाठी सर्वसमावेशक कर्ज सारांश, परतफेडीचे तपशील आणि अटी व शर्ती सादर करेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com