Indri: 'इंद्री'चा जगाभरात डंका! सिंगल माल्ट ब्रँडची दुसऱ्याच वर्षी एक लाखाहून अधिक बॉक्सची विक्री

Single Malt Whisky: स्कॉच आणि अमेरिकन प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत इंद्रीने व्हिस्की ऑफ द वर्ल्ड अवॉर्ड्समध्ये ‘बेस्ट व्हिस्की इन द वर्ल्ड’ हा पुरस्कार जिंकला आहे.
Indri Single malt whisky
Indri Single malt whiskyDainik Gomantak
Published on
Updated on

पिकाडिली डिस्टिलरीजच्या इंद्री सिंगल माल्ट व्हिस्कीने लाँच झाल्याच्या अवघ्या दोन वर्षांत 1 लाख बॉक्सची विक्री करण्याचा टप्पा ओलांडूला आहे. यामुळे आता इंद्रीला जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या सिंगल माल्ट व्हिस्कीचा पुरस्कार मिळवून दिला आहे.

नोव्हेंबर 2021 मध्ये लॉन्च झाल्यापासून, इंद्रीने जागतिक स्तरावर 25 हून अधिक प्रतिष्ठित पुरस्कार मिळवले आहेत, ज्यात जागतिक व्हिस्की पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय व्हिस्की स्पर्धा यासारख्या प्रसिद्ध कार्यक्रमांमध्ये ‘बेस्ट इंडियन सिंगल माल्ट’ सारख्या किताबांचा समावेश आहे.

स्कॉच आणि अमेरिकन प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत इंद्रीने व्हिस्की ऑफ द वर्ल्ड अवॉर्ड्समध्ये ‘बेस्ट व्हिस्की इन द वर्ल्ड’ हा पुरस्कार जिंकला आहे.

Indri Single malt whisky
Vedanta Mining In Goa: सहा वर्षानंतर गोव्यात खाण व्यवसायाचा श्रीगणेशा, सेसा वेदांताचा ब्लॉक-1 कार्यान्वित

इंद्री-त्रिणीच्या यशाने केवळ भारतालाच गौरव मिळवून दिला नाही तर जागतिक स्तरावर सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या सिंगल माल्ट व्हिस्कीच्या एलिट क्लबमध्ये आपले स्थान भक्कम केले आहे.

स्कॉटलंड, जपान, तैवान किंवा इतर ठिकाणची कोणतीही सिंगल माल्ट व्हिस्कीचे, लाँच झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षांत एक लाख बॉक्स विकले गेले नव्हते. ही कामगिरी मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल ५९९% वाढीली आहे.

Indri Single malt whisky
India Economy: 'ही' 8 राज्ये बनणार देशाचे ग्रोथ इंजिन; 2047 पर्यंत GDP होईल 35 ट्रिलियन

ब्रँडने म्हटले आहे की, जगातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या सिंगल माल्ट व्हिस्कींपैकी एक बनण्याच्या उद्देशाने त्यांनी महत्त्वाकांक्षी विस्तार योजना आखल्या आहेत.

अहवालानुसार, २०२१-२२ मध्ये भारतीय सिंगल माल्ट व्हिस्कीमध्ये १४४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन अल्कोहोलिक बेव्हरेज कंपनीज (सीआयएबीसी) ने म्हटले आहे की, 2023 मध्ये एकूण विक्रीमध्ये 53 टक्के वाट भारतीय सिंगल माल्ट्सचा होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com