Byju Layoffs: बायजूवर आर्थिक संकट, कोणतही कारण न देता कर्मचाऱ्यांना नारळ देण्यास सुरुवात; रिपोर्ट

Byju Crisis: एज्युटेक ब्रँड बायजूचे संकट वाढत आहे. वास्तविक, बायजूची मूळ कंपनी थिंक अँड लर्न आर्थिक संकटामुळे टाळेबंदी करत आहे.
Byju Layoffs
Byju LayoffsDainik Gomantak
Published on
Updated on

Byju Crisis: एज्युटेक ब्रँड बायजूचे आर्थिक संकट अधिक गडद चालले आहे. वास्तविक, बायजूची मूळ कंपनी थिंक अँड लर्न आर्थिक संकटामुळे टाळेबंदी करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बायजूने फोन कॉल्सद्वारे आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्यास सुरुवात केली आहे. अहवालात म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांना नोटीस दिली गेली नाही किंवा परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट प्लॅन (पीआयपी) मध्ये समाविष्टही केले गेले नाही.

काही कर्मचाऱ्यांचा हवाला देत मनीकंट्रोलने सांगितले की, HR द्वारे एक फोन कॉल केला गेला होता आणि त्यांना कोणतेही कारण न देता कामावरुन काढून टाकल्याचे सांगण्यात आले. यानंतर एचआर एक्झिक्युटिव्हने कर्मचाऱ्याचा नंबर ब्लॉक केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीचे 100 ते 500 कर्मचारी टार्गेटवर आहेत. बायजूने गेल्या दोन वर्षांत किमान 10,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. यापूर्वी, इंडिया युनिटचे सुमारे 14,000 कर्मचारी पेरोलवर होते.

Byju Layoffs
"संस्थापक रवींद्रन फर्म चालवण्यासाठी अयोग्य," BYJU's च्या गुंतवणूकदारांकडून NCLT च्या हस्तक्षेपाची मागणी

पगार मिळण्यास विलंब होईल

एकेकाळी आघाडीची एज्युटेक कंपनी असलेल्या बायजूला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. नुकतेच बायजूने आपल्या कर्मचाऱ्यांना सांगितले की, मार्च महिन्याच्या पगार वितरणात पुन्हा एकदा विलंब होणार आहे. बायजूच्या व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये या परिस्थितीसाठी अंतरिम आदेशाला जबाबदार धरले आहे. हा अंतरिम आदेश फेब्रुवारीच्या अखेरीस काही परदेशी गुंतवणूकदारांना मिळाला होता. या अंतर्गत राइट्स इश्यूच्या मुद्यावरुन उभारलेल्या पैशाच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. 8 एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांना पगार वाटप करण्याचे काम करत असल्याचे आश्वासनही बायजूने कर्मचाऱ्यांना दिले आहे. या कठीण काळात कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या संयमाबद्दल व्यवस्थापनाने आभार मानले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com