RBI Governer : 2000 नंतर 500 च्या नोटाही चलनातून बाद होणार का? वाचा, RBI गव्हर्नर काय म्हणतायेत

RBI Governer 500 Note : भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी या बातम्यांना केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे, ज्यामध्ये ५०० रुपयांची नोट बंद करून १००० रुपयांची नोट पुन्हा चलनात आणण्याचे दावे केले जात आहेत.
RBI Governer Shaktikant Das
RBI Governer Shaktikant DasDainik Gomantak
Published on
Updated on

Rumors about the Rs 500 note

रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर विविध चर्चा रंगत आहेत. रिझर्व्ह बँक लवकरच 500 रुपयांच्या नोटांचे चलन बंद करणार असून 1000 रुपयांच्या नोटा पुन्हा चलनात आणण्याची योजना आहे, अशीही चर्चा आहे.

मात्र, आता आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी हे वृत्त निव्वळ अफवा असल्याचे सांगितले आहे. आरबीआय गव्हर्नर यांनी गुरुवारी सांगितले की, रिझर्व्ह बँकेची अशी कोणतीही योजना नाही. ते म्हणाले, RBI 500 रुपयांच्या नोटा काढून टाकण्याचा किंवा 1000 रुपयांच्या नोटा पुन्हा चलनात आणण्याचा विचार करत नाही.

आर्थिक वर्ष 2024 चे दुसरे द्विमासिक चलन धोरण सादर केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत गव्हर्नरांनी ही माहिती दिली. तसेच लोकांनी अशा अफवा टाळण्याचा इशारा दिला आहे. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांबाबत आरबीआय गव्हर्नर यांचे हे स्पष्टीकरण 2,000 रुपयांच्या नोटांचे चलन बंद करण्याच्या निर्णयानंतर काही दिवसांनी आले आहे.

RBI Governer Shaktikant Das
Odisha Train Tragedy: अपघातानंतर शाळेत जाण्यास का भीत आहेत विद्यार्थी? जाणून घ्या यामागचे कारण...

2,000 च्या 50 टक्के नोटा पुन्हा बॅंकेत

आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, चलनात असलेल्या 2,000 रुपयांच्या 50 टक्के नोटा आतापर्यंत रिझर्व्ह बँकेकडे परत आल्या आहेत. ते म्हणाले, 3.62 लाख कोटी रुपयांच्या 2,000 रुपयांच्या नोटा सध्या चलनात (बाजारात) होत्या.

नोटाबंदीच्या घोषणेनंतर सुमारे १.८ लाख कोटी रुपयांच्या २ हजार रुपयांच्या नोटा परत आल्या आहेत. बाजारातील एकूण 2,000 रुपयांच्या नोटांपैकी हे प्रमाण 50 टक्के आहे. ते म्हणाले की बँकांमध्ये परत आलेल्या 2,000 रुपयांच्या नोटांपैकी 85 टक्के लोकांनी त्यांच्या बँक खात्यात जमा केले आहे, तर उर्वरित 15 टक्के नोटा 500 किंवा 100 रुपयांच्या नोटांनी बदलल्या आहेत.

RBI Governer Shaktikant Das
Watch Video : Zomato Ad मध्ये लगानमधील 'कचरा'; नेटकऱ्यांनी झापल्यानंतर जाहिरात मागे घेण्याची नामुष्की

2000 रुपयांच्या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बदलता येणार

19 मे रोजी आरबीआयने 2,000 रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याची घोषणा केली होती. यासोबतच, असे असूनही या नोटा कायदेशीररित्या वैध राहतील, असेही सांगण्यात आले.

आरबीआयने म्हटले होते की, सर्वसामान्य जनता ३० सप्टेंबरपर्यंत कधीही बँकेत जाऊन २,००० रुपयांची नोट इतर कोणत्याही नोटेसोबत बदलू शकतो.

20,000 किंवा 2,000 रुपयांच्या फक्त 10 नोटा एका वेळी बदलता येतील. या घोषणेनंतर लोकांनी बँकांमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com