RBI
RBI Dainik Gomantak

RBI: नागरी सहकारी बँकांबाबत रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर

सध्या UCB बँका टियर-1 आणि टियर-2 अशा दोन श्रेणींमध्ये विभागल्या आहेत.
Published on

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गुरुवारी नागरी सहकारी बँकांबाबत (Urban Co-operative Banks) मोठा निर्णय घेतला आहे. नागरी सहकारी बँकांचे चार विभागात वर्गीकरण करणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. तसेच, नागरी बँकांच्या नेट वर्थ आणि उपलब्ध भांडवलबाबत देखील काही नियम जारी केले आहेत. याबाबत आरबीआयने एक परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.

RBI
Mumbai: तेरा वर्षीय मुलीवर शाळेत बलात्कार, आठवीतील दोन मुले पोलिसांच्या ताब्यात

नागरी सहकारी बँकांच्या चार-स्तरीय वर्गीकरणाचा निर्णय तात्काळ प्रभावाने लागू होणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकानुसार, सध्या UCB बँका टियर-1 आणि टियर-2 अशा दोन श्रेणींमध्ये विभागल्या आहेत. यापुढे आता त्यांची चार श्रेणीत विभागणी केली जाणार आहे. बँकामध्ये असलेल्या ठेवीवर आधारित हे बँकाचे वर्गीकरण केले जाणार आहे.

RBI
Sidhu Moose Wala Case: सिद्धू मूसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रार ताब्यात

असे असेल वर्गीकरण

टियर-I UCB मध्ये 100 कोटी रुपयांपर्यंत ठेवी असलेल्या सहकारी बँका असतील.

टियर-II UCB मध्ये 100 कोटी ते 1,000 कोटींच्या ठेवी असलेल्या बँका.

रु. 1,000 कोटी ते 10,000 कोटींच्या ठेवी असलेले टियर-III आणि रु. 10,000 कोटींपेक्षा जास्त ठेवी असलेल्या बँका टियर-IV मध्ये असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com