RBI ची मोठी कारवाई, 8 बँकांचे परवाने केले रद्द; व्यवहार करता येणार नाहीत!

Cooperative Banks License: गेल्या काही वर्षांपासून बँकांना रिझर्व्ह बँकेकडून (RBI) कडक कारवाईचा सामना करावा लागत आहे. याचा परिणाम म्हणजे आरबीआयने काही बँकांचे परवानेही रद्द केले.
RBI Governor
RBI GovernorDainik Gomantak
Published on
Updated on

Reserve Bank Of India: तुमचे बँक खाते सहकारी बँकेत असेल तर तुम्ही ही बातमी जरुर वाचा. गेल्या काही वर्षांपासून बँकांना रिझर्व्ह बँकेकडून (RBI) कडक कारवाईचा सामना करावा लागत आहे.

याचा परिणाम म्हणजे आरबीआयने काही बँकांचे परवानेही रद्द केले. एवढेच नाही तर मध्यवर्ती बँकेने काही मोठ्या बँकांना मोठा दंडही ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेच्या कारवाईत सर्वाधिक नुकसान सहकारी बँकांना होत आहे.

रिझर्व्ह बँकेने 114 वेळा दंडही ठोठावला

31 मार्च रोजी संपणाऱ्या 2022-23 या आर्थिक वर्षात RBI ने आठ सहकारी बँकांचे परवाने रद्द केले आहेत. नियमांचे पालन न केल्याने रिझर्व्ह बँकेने या बँकांवर 114 वेळा दंडही ठोठावला आहे.

सहकारी बँकांच्या माध्यमातून ग्रामीण भागात बँकिंग सेवेचा झपाट्याने विस्तार झाला आहे. मात्र या बँकांमधील (Banks) अनियमितता समोर आल्याने आरबीआयला कठोर पावले उचलावी लागली.

RBI Governor
RBI on Foreign Currency: बॅंक खातेदारांसाठी मोठी अपडेट, आरबीआयने घेतला मोठा निर्णय; या बँकेला...

नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप

सहकारी बँकांना दुहेरी नियमन आणि कमजोर वित्त व्यतिरिक्त स्थानिक नेत्यांच्या हस्तक्षेपाचा सामना करावा लागत आहे.

नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या सहकारी बँकांवर रिझर्व्ह बँकेने धडक कारवाई सुरु केली आहे. गेल्या वर्षभरात आठ बँकांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया RBI ने कोणत्या बँकांचे परवाने रद्द केले?

या बँकांचे परवाने रद्द करण्यात आले

1. मुधोळ सहकारी बँक

2. मिलथ को-ऑपरेटिव्ह बँक

3. श्री आनंद को-ऑपरेटिव्ह बँक

4. रुपी को-ऑपरेटिव्ह बँक

5. डेक्कन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक

6. लक्ष्मी सहकारी बँक

7. सेवा विकास सहकारी बँक

8. बाबाजी दाते महिला अर्बन बँक

RBI Governor
RBI Repo Rate Hike: सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी, RBI गर्व्हनर यांची महत्वाची घोषणा....

दुसरीकडे, रिझव्‍‌र्ह बँकेने वर नमूद केलेल्या बँकांचे परवाने अपुरे भांडवल, बँकिंग नियमन कायद्याच्या नियमांचे पालन न केल्यामुळे झाले.

भविष्यातील उत्पन्नाच्या शक्यता नसल्यासारख्या कारणांमुळे देखील रद्द केले. गेल्या अनेक वर्षांपासून सहकारी बँकिंग क्षेत्रावर आरबीआयकडून देखरेख केली जात आहे.

मध्यवर्ती बँकेने 2021-22 मध्ये 12 सहकारी बँकांचे, 2020-21 मध्ये 3 सहकारी बँकांचे आणि 2019-20 मध्ये दोन सहकारी बँकांचे परवाने रद्द केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com