FD Rates: आजच्या काळात गुंतणूकदारापुढे गुंतवणुकीचे अनेक पर्याय खुले आहेत. या पर्यांयामध्ये एफडी म्हणजेच मुदत ठेव हे देखील गुंतवणुकीचे एक माध्यम आहे.
जरी मुदत ठेवी इतर गुंतवणुकीच्या तुलनेत खूपच कमी व्याजदर देतात, तरीही त्या सुरक्षित गुंतवणूक मानल्या जातात. विशेष म्हणजे, तुमच्या भांडवलाला कोणत्याही प्रकारचा धोका नसतो.
सध्या साधारण एफडीवर बँकांमार्फत वार्षिक 5 टक्के व्याज दिले जाते. मात्र, आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बँक एफडीबाबत महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या मासिक बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, बँकांमध्ये त्यांच्या ठेवींचा आधार वाढवण्याची तीव्र स्पर्धा बँकांना एफडी दर वाढवण्यास भाग पाडू शकते. आरबीआयने दर वाढ केल्यानंतर बँका ठेवींचे दर वाढवत आहेत.
त्याचवेळी, गेल्या वर्षी मे महिन्यापासून रिझर्व्ह बँकेने महागाई (Inflation) नियंत्रित करण्यासाठी अल्प मुदतीच्या कर्जदरात 225 बेसिस पॉईंट्सची वाढ केली आहे.
अलिकडच्या काळात FDs वरील परतावा सुधारला. दुसरीकडे, बचत ठेव दरातील तफावत वाढल्याने, बँक ठेवींचा एक मोठा भाग एफडीच्या रुपात कमावला गेला आहे.
वार्षिक (वर्ष-दर-वर्ष) आधारावर, FD ने 13.2 टक्के वाढ नोंदवली, तर चालू आणि बचत ठेवी अनुक्रमे 4.6 टक्के आणि 7.3 टक्क्यांच्या मध्यम गतीने वाढल्या, असे मार्च 2023 च्या RBI बुलेटिनमध्ये म्हटले आहे.
आरबीआयने (RBI) म्हटले आहे की, अलीकडच्या काही महिन्यांत पत वाढीत काही प्रमाणात घट असूनही, एकूण वाढ मजबूत आहे. मे 2022 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत बँकांनी त्यांचा 1 वर्षाचा सरासरी मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) 135 बीपीएसने वाढवला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.