Realme P4 Power: रिअलमीचा मास्टरस्ट्रोक! 10,001mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंगसह स्मार्टफोनची एंट्री; किंमत, फीचर्स जाणून घ्या

Realme P4 Power Launch Date: प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी 'Realme' भारतात आपला एक क्रांतिकारी स्मार्टफोन Realme P4 Power लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे.
Realme P4 Power
Realme P4 PowerDainik Gomantak
Published on
Updated on

स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी सर्वात मोठी डोकेदुखी असते ती म्हणजे फोनची वारंवार संपणारी बॅटरी. मात्र, आता ही चिंता कायमची दूर होण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी 'Realme' भारतात आपला एक नवा स्मार्टफोन Realme P4 Power लाँच करण्यासाठी सज्ज झाली आहे.

या फोनचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे याची १०,००१mAh ची महाकाय बॅटरी. कंपनीच्या दाव्यानुसार, एकदा चार्ज केल्यानंतर हा फोन सलग ३२ तासांहून अधिक काळ व्हिडिओ स्ट्रीमिंग करू शकतो.

विशेष म्हणजे, इतकी मोठी बॅटरी असूनही फोन चार्ज करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही, कारण यात ८०W ची फास्ट चार्जिंग सुविधा दिली आहे. इतकेच नाही तर, हा फोन पॉवरबँक म्हणूनही वापरता येईल; यात २७W 'रिव्हर्स चार्जिंग' सपोर्ट आहे, ज्याद्वारे तुम्ही इतर फोनही चार्ज करू शकाल.

डिस्प्ले आणि डिझाइन

Realme P4 Power मध्ये १४४Hz रिफ्रेश रेट असलेला HyperGlow 4D Curve+ डिस्प्ले दिला आहे, जो १.५K रिझोल्यूशनसह येतो. डिझाइनच्या बाबतीत कंपनीने पर्ल अकादमीसोबत भागीदारी केली असून, हा फोन ट्रान्स ऑरेंज, ट्रान्स सिल्वर आणि ट्रान्स ब्लू अशा तीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल. सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे, १०,००१mAh बॅटरी असूनही या फोनचे वजन अवघे २१९ ग्रॅम राखण्यात कंपनीला यश आले आहे.

Realme P4 Power
Goa Education: 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! दहा टक्‍के गुण मिळवणारेही होणार उत्तीर्ण; वाचा संपूर्ण माहिती..

प्रोसेसर

कार्यक्षमतेसाठी या फोनमध्ये MediaTek Dimensity 7400 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे, जो गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी उत्तम मानला जातो. हा फोन Android 16 वर आधारित Realme UI 7.0 वर चालेल.

विशेष म्हणजे, कंपनीने या फोनसाठी ३ वर्षांचे ओएस अपडेट्स आणि ४ वर्षांचे सिक्युरिटी पॅच देण्याचे आश्वासन दिले आहे, ज्यामुळे हा फोन दीर्घकाळ सुरक्षित राहील.

Realme P4 Power
New BJP President Goa Visit: भाजपचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर!

कॅमेरा आणि टिकाऊपणाची खात्री

फोटोग्राफीसाठी यात ५०MP चा मुख्य कॅमेरा (OIS सह) आणि १६MP चा सेल्फी कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. तसेच, धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी यात IP68 आणि IP69 रेटिंग दिले जाण्याची शक्यता आहे.

कंपनीने बॅटरीच्या गुणवत्तेवर इतका विश्वास दाखवला आहे की, जर ४ वर्षांच्या आत बॅटरीची हेल्थ ८०% च्या खाली गेली, तर कंपनी फोन मोफत बदलून देणार असल्याचे म्हटले आहे. या फोनची किंमत ३७,९९९ रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com