RBI to buy Rs 20,000 crore bond in July
RBI to buy Rs 20,000 crore bond in JulyDainik Gomantak

जुलै महिन्यात RBI खरेदी करणार 20 हजार कोटींचे बॉन्ड

रिझर्व्ह बॅंकेच्या(RBI) म्हणण्यानुसार, 'या' योजनेंतर्गत पुढील खरेदी 22 जुलै रोजी 20,000 कोटी रुपयांना होईल.
Published on

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(RBI) जुलै ते सप्टेंबर या कालावधीत जी-सेक(G-SEK) अधिग्रहण कार्यक्रमांतर्गत 1.2 लाख कोटी रुपयांच्या सरकारी सिक्युरिटीज किंवा जी-सेक्सची खुल्या बाजारात खरेदी करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

केंद्रीय बँकेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ते बहु-सुरक्षा लिलावाद्वारे आणि एकाधिक किंमतीच्या पद्धतीनुसार जी-सेक्स खरेदी करेल. त्यानंतर, 20,000 कोटी रुपयांच्या जी-सेक्सची पहिली खरेदी 8 जुलै 2021 रोजी होणार असल्याची माहितीही या निवेदनात देण्यात अली आहे.

RBI to buy Rs 20,000 crore bond in July
Domestic Flight: देशांतर्गत प्रवासासाठी विमानसेवेत वाढ

रिझर्व्ह बँकेने असे नमूद केले आहे की स्वतंत्र सिक्युरिटीज खरेदी करण्याच्या प्रमाणावर निर्णय घेण्याचा आणि एकूण रकमेपेक्षा कमी किंमतीसाठी बोली स्वीकारण्याचा अधिकार आपल्याकडे असून त्याच अनुषंगाने बॉंड खरेदीचा हा निर्णय घेण्यात आला आहे. एकाधिक किंमत पद्धतीचा वापर करून मल्टी सिक्युरिटी लिलावाद्वारे केंद्रीय बँक सरकारी सिक्युरिटीज खरेदी करेल.

पात्र सहभागींना 8 जुलै 2021 रोजी सकाळी 10 ते 11 या दरम्यान आरबीआय कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) प्रणालीवर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात बिड सादर करण्यास सांगण्यात आले असून त्याच दिवशी ही खरेदी सादर होणार आहे. मात्र जर या ऑनलाईन यंत्रणेत बि ड करताना प्रत्यक्षात बिघाड झाल्यासच फिजिकल रूपात बिड स्वीकारल्या जातील आणि ही भौतिक बिड आरबीआयच्या फायनान्शियल मार्केट ऑपरेशन्स विभागात सादर करावीलागणार आहे.

RBI to buy Rs 20,000 crore bond in July
CBSE: आता 10 वी आणि 12 वीची 2 वेळा परीक्षा

लिलावाचा निकाल त्याच दिवशी जाहीर करण्यात येईल आणि यशस्वी सहभागींनी 9 जुलै 2021 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत त्यांच्या एसजीएल खात्यात सिक्युरिटीजची खात्री करुन घ्यावी.

रिझर्व्ह बॅंकेच्या म्हणण्यानुसार, या योजनेंतर्गत पुढील खरेदी 22 जुलै रोजी , 20,000 कोटी रुपयांना होईल.

एप्रिलमध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले होते की," केंद्रीय बँक 2021-22 आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 1 लाख कोटी रुपयांच्या सरकारी सिक्युरिटीजची खुली बाजारपेठ खरेदी करेल.आणि त्याच नुसार 25,000 कोटींचा पहिला लिलाव 15 एप्रिल रोजी घेण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com