Domestic Flight: देशांतर्गत प्रवासासाठी विमानसेवेत वाढ

देशांतर्गत उड्डाणांची(Domestic Flight) संख्या 15 टक्क्यांनी वाढविण्यास परवानगी दिली

Permission to increase the number of domestic flights by 15 per cent
Permission to increase the number of domestic flights by 15 per centDainik Gomantak
Published on
Updated on

देशात आता कोविड(Covid19) रुग्णांच्या रुग्णसंख्येत बऱ्याच प्रमाणात कमी दिसत आहे. त्यासोबतच अनेक व्यसायही आता सुरळीत होऊ लागले आहेत. आणि सोडली या पार्श्वभूमीवर वाहतूक उद्योगही(Air Travel) विमानांची संख्या वाढवत आहे.

याच अनुषंगाने आता सरकारने देशांतर्गत उड्डाणांची(Domestic Flight) संख्या 15 टक्क्यांनी वाढविण्यास परवानगी दिली असून यापूर्वी 50 टक्के विमानांना उड्डाण करण्याची परवानगी होती. मात्र आता ती वाढवून वाढवून 65 टक्केइतकी केली आहे. हा निर्णय 5 जुलै पासून अंमला आणला आहे.

मात्र अजूनही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 31 जुलैपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंदी घालण्यात अली आहे. सरकारने या मार्गावर उड्डाणे सुरू करण्यास परवानगी दिली नाही. विमान उड्डाण मंत्रालयाने ट्वीट केले आहे की,"देशांतर्गत उड्डाणांची वाढती मागणी लक्षात घेता त्याची क्षमता 50 टक्क्यांवरून 65 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात येत आहे. हा आदेश 31 जुलै 2021 पर्यंत किंवा पुढील आदेशांपर्यंत चालू राहील."


Permission to increase the number of domestic flights by 15 per cent
आयफोन यूजर्स जर WIFI कनेक्ट कराल तर...

या सर्वांची सुरवात करताना कोरोनाच्या अनुषंगाने उपाययोजनाही केल्या जात आहेत. यापूर्वी खासगी एअर इंडिया इंडियाने नऊ विमानांचे काम सुरू केले असून यात क्रू मेंबर्स ते पायलटपर्यंत सर्वांना पूर्णपणे लसीकरण केले जात आहे. त्यांना लसचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ज्या ठिकाणी पूर्णपणे लसीकरण करून विमान वाहतूक केली जात आहे ती म्हणजे बेंगलोर -कोलकाता, कोलकाता-बेंगलोर, बेंगलोर-चेन्नई, चेन्नई-गुवाहाटी, गुवाहाटी-बेंगलोर, बेंगलोर-पुणे, पुणे-जयपूर, जयपूर-पुणे आणि पुणे -बेंगलोर ही ठिकाणे आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com