CBSE: आता 10 वी आणि 12 वीची 2 वेळा परीक्षा

आजारांमुळे परीक्षा स्थगित आणि रद्द होत आहेत. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा हे एक मॉडेल असून सीबीएसई(CBSE) त्याचे नियोजनही करत आहे.
 CBSE will take 10th and 12th exams twice in a year
CBSE will take 10th and 12th exams twice in a year Dainik Gomantak

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत(Board Exam) एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. या नवीन निर्णयानुसार यंदा वर्षातून दोनवेळा परीक्षा घेण्यात येणार आहे आणि त्यामुळे आता सीबीएसईने दहावी आणि बारावीच्या शैक्षणिक वर्ष 2021-22 ला दोन भागात विभागलं आहे. प्रत्येक सत्रात जवळपास 50 टक्के अभ्यासक्रम ठेवण्यात येणार असून . मागील सत्राप्रमाणे 2021-22 च्या अभ्यासक्रमातही कपात केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याबात लवकरच अधिकृत घोषणाही होणार आहे.

मंडळाने सोमवारी ग्रस्त शैक्षणिक सत्रासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना दिल्या तथापि, सीबीएसईच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही योजना मंडळाची नवीन मूल्यांकन प्रणाली म्हणून सुरू राहील.सध्याच्या सत्रासाठी पहिली टर्म वस्तुनिष्ठ परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबर 2021 मध्ये घेण्यात येईल, तर विषयनिष्ठ प्रश्नांसह दुसऱ्या टर्मची परीक्षा मार्च-एप्रिल 2022 मध्ये होईल असे सागणितले जात आहे.

 CBSE will take 10th and 12th exams twice in a year
West Bengal: राज्यात पुन्हा एकदा विधानपरिषद ?

तसेच परिस्थिती सामान्य झाल्यावर बोर्ड ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टर्म 1 आणि फेब्रुवारी-मार्चमध्ये टर्म 2 ची परीक्षा घेईल आणि या परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमासाठी असतील असेही या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे. दुसर्‍या टर्मच्या शेवटी, बोर्ड टर्म 2 आयोजित करेल. हा पेपर 120 मिनिटांचा असेल आणि त्यात वेगवेगळ्या स्वरुपाचे विषयनिष्ठ प्रश्न असतील.परंतु कोविड -19 मुळे जर परीक्षेसाठी परिस्थिती अनुकूल राहिली नाही तर टर्म 2 च्या अखेरीस 20 मिनिटांची एमसीक्यू-आधारित परीक्षा घेण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका ओएमआर शीटवर घेतल्या जाऊन, त्या स्कॅनिंगनंतर थेट सीबीएसई पोर्टलवर अपलोड केले जाऊ शकतात किंवा त्याच दिवशी शाळेने वैकल्पिकरित्या अपलोड केले जाऊ शकतात.

 CBSE will take 10th and 12th exams twice in a year
Special Train: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या नागरिकांची सेंट्रल रेल्वेने केली सोय

विद्यार्थी त्या विशिष्ट टर्म-एंड परीक्षेसाठी केवळ विशिष्ट अभ्यासक्रमाचा अभ्यास करतील. पहिल्या टर्म अभ्यासक्रमाचा कोणताही भाग दुसर्‍या टर्म परीक्षेचा भाग नसेल असेही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

परंतु दोन्ही परीक्षांसाठी शाळा पूर्णपणे बंद झाल्यास, परीक्षेचे अंतर्गत मूल्यांकन / प्रॅक्टिकल / प्रोजेक्ट वर्क आणि उमेदवाराने घरातून घेतलेल्या टर्म 1 आणि २च्या सिद्धांताच्या गुणांच्या आधारे गणना केली जाईल.

दरम्यान देशात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक दिवसांपासून परीक्षा झाल्या नाहीत. आजारांमुळे परीक्षा स्थगित आणि रद्द होत आहेत. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा हे एक मॉडेल असून सीबीएसई त्याचे नियोजनही करत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com