Post Office मध्ये बचत करणाऱ्यांचे बल्ले-बल्ले, नवीन वर्षापासून मिळणार एवढी मोठी रक्कम

Post Office: 2023 वर्ष सुरु होणार आहे. यानिमित्ताने आता नववर्षानिमित्त सरकारने जनतेला एक भेट दिली आहे.
Post Office
Post OfficeDainik Gomantak
Published on
Updated on

Post Office: 2023 वर्ष सुरु होणार आहे. यानिमित्ताने आता नववर्षानिमित्त सरकारने जनतेला एक भेट दिली आहे. या भेटवस्तूचा लोकांच्या बचतीवर खूप सकारात्मक परिणाम होणार आहे. तर दुसरीकडे, पोस्ट ऑफिसमध्ये पैसे जमा करणाऱ्यांना सरकारने नवीन वर्षाची भेट दिली आहे.

दरम्यान, सरकारने पोस्ट ऑफिस (Post Office) एफडी, एनएससी आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनांसह लहान बचत ठेव योजनांवरील व्याजदर 1.1 टक्क्यांनी वाढवले ​​आहेत. हे दर 1 जानेवारी 2023 पासून लागू होतील, असे सरकारने जाहीर केले आहे. कराचा लाभ न मिळणाऱ्या पोस्ट ऑफिस योजनांवर सरकारने व्याजदरात वाढ केली आहे.

Post Office
Post Office Investment Scheme: पोस्टाच्या 'या' योजनेत पैसे गुंतवा आणि मिळवा 16 लाख रूपयांचा परतावा

व्याजदर बदलतील

वित्त मंत्रालयाकडून माहिती देताना सांगण्यात आले की, NAC, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि किसान विकास पत्रावर दिल्या जाणाऱ्या व्याजदरात 1.1 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर या योजनांमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर आकारला जातो. व्याजदरात (Interest Rate) वाढ केल्यानंतर सर्व योजनांचे व्याजदरही 1 जानेवारीपासून बदलणार आहेत. आता मासिक उत्पन्न योजनेचा व्याजदर 7.1 टक्के करण्यात आला आहे.

व्याजदर असेल

आता नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटवर 7 टक्के, ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर 8 टक्के, पोस्ट ऑफिसच्या एक ते पाच वर्षांच्या एफडीवरील व्याजदर 1.1 टक्क्यांनी वाढणार आहेत. याशिवाय, आता मासिक उत्पन्न योजनेत 7.1 टक्के व्याज मिळणार आहे. त्याचवेळी, यापैकी काही योजना अशाही आहेत, ज्यामध्ये सलग दुसऱ्या तिमाहीत व्याजदर वाढवण्यात आले आहेत.

Post Office
Post Office: सुरक्षित गुंतवणूकीसाठी पोस्ट उत्तम पर्याय, कर्जापासून कॅशबॅकपर्यंतचे फायदे; जाणून घ्या

FD वर व्याज

नवीन व्याजदरांनुसार, पोस्ट ऑफिसला एका वर्षाच्या एफडीवर 6.6%, दोन वर्षांच्या एफडीवर 6.8%, तीन वर्षांच्या एफडीवर 6.9% आणि पाच वर्षांच्या एफडीवर 7% व्याज मिळेल. दुसरीकडे, जानेवारी-मार्च दरम्यान ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर 0.4 टक्के अधिक व्याज दिले जाईल. या योजनेवर आठ टक्के व्याज दिले जाणार आहे. त्याचवेळी, KVP चा व्याज दर 7.2 टक्के झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com