Post Office: सुरक्षित गुंतवणूकीसाठी पोस्ट उत्तम पर्याय, कर्जापासून कॅशबॅकपर्यंतचे फायदे; जाणून घ्या

Post Office Premium Saving Account: तुम्हालाही सुरक्षित गुंतवणूक करायची असेल, तर पोस्ट ऑफिस हा उत्तम पर्याय आहे.
Post Office
Post OfficeDainik Gomantak
Published on
Updated on

Post Office Premium Saving Account: तुम्हालाही सुरक्षित गुंतवणूक करायची असेल, तर पोस्ट ऑफिस हा उत्तम पर्याय आहे. बहुतेक लोकांना पोस्टाच्या स्मॉल सेव्हिंग अकाउंटमध्ये गुंतवणूक करायला आवडते. अशा स्थितीत पोस्ट ऑफिसच्या योजना वेळोवेळी सुरु असतात. पोस्ट ऑफिसकडून प्रीमियम बचत खात्यातर्गंत अनेक सुविधा पुरवल्या जात आहेत. प्रीमियम बचत खात्यांतर्गत लोकांना कॅशबॅकपासून कर्ज, डोअरस्टेप बँकिंगपर्यंतच्या उत्तम सुविधा मिळत आहेत. चला तर मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊया...

पोस्ट ऑफिस प्रीमियम बचत खात्याची खासियत जाणून घ्या

पोस्ट ऑफिस योजनांमध्ये ग्राहकांना अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. पोस्ट ऑफिस प्रीमियम बचत खात्यामध्ये गुंतवणूक केल्यास मोठा लाभ मिळतो.

  • यामध्ये ग्राहकांना अमर्याद पैसे काढण्याची आणि जमा करण्याची सुविधा मिळते.

  • यामध्ये इतर बँकांप्रमाणेच डोरस्टेप सुविधेचा लाभही मिळत आहे.

  • या अंतर्गत कर्ज (पोस्ट ऑफिस लोन) देखील मिळू शकते.

  • यामधून कोणत्याही प्रकारचे बिल भरल्यास कॅशबॅक देखील मिळेल.

  • यामध्ये फिजिकल आणि व्हर्च्युअल डेबिट कार्डही जारी केले जातात.

Post Office
Post Office: पोस्टाच्या योजनेत पैसे गुंतवणूक करणाऱ्यांना लागली लॉटरी, जाणून घ्या

लाभ कोणाला मिळणार?

आता प्रश्न असा आहे की, या विशेष योजनेचा लाभ कोणाला मिळणार? 10 वर्षांपेक्षा जास्त वयाचा कोणताही ग्राहक हे खाते उघडू शकतो. परंतु तुम्हाला हे माहित असले पाहिजे की, यासाठी तुम्हाला केवायसी करणे अनिवार्य आहे. पोस्ट ऑफिसच्या शाखेत जाऊन तुम्ही या अप्रतिम सुविधेसह खाते उघडू शकता.

Post Office
Post Office Scheme: मुलींसाठी सरकारची खास योजना, 250 रुपये जमा करुन मिळवा लाखोंचा फायदा

प्रीमियम खात्याचे तपशील

पोस्ट ऑफिस अंतर्गत प्रीमियम खाते उघडल्यावर, तुम्हाला सुमारे 149 रुपये जीएसटी भरावा लागेल. एवढेच नाही तर तुम्हाला वार्षिक 99 रुपये अधिक जीएसटीही भरावा लागेल. या अकाऊंट अंतर्गत मिनिमम बॅलन्सची मर्यादा नाही, पण तरीही खाते उघडताना तुम्हाला किमान 200 रुपये जमा करावे लागतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com