ग्राहकांमध्ये निराशा, PNB बँकेने बंद केली ही सुविधा

तुमचे खाते पंजाब नॅशनल बँकेत (PNB) असल्यास, ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे.
PNB
PNBDainik Gomantak
Published on
Updated on

PNB Stops Incentive: तुमचे खाते पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) असल्यास, ही बातमी तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर डिजिटल मोडमध्ये पैसे भरत असाल तर ही बातमी वाचून तुमची नक्कीच निराशा होईल. होय, पेट्रोल-पंपांवर तेल खरेदीसाठी पेट्रोलियम मार्केटिंग कंपन्यांनी डिजिटल पेमेंटवर दिलेली 0.75 टक्के सूट बंद केली आहे. (pnb stop sincentive pnb stops 0-75 percent incentive on fuel purchases via digital modes)

बँकेने ग्राहकांना लाभ देणे बंद केले

त्याचा परिणाम अशा लोकांवर अधिक होईल, जे अनेकदा पेट्रोल (Petrol) किंवा डिझेल भरण्यासाठी कार्डद्वारे पैसे देतात. सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बँकेने (PNB) हा लाभ ग्राहकांना हस्तांतरित करणे थांबवले आहे. याचा परिणाम PNB च्या सर्व 18 कोटी ग्राहकांवर होणार आहे. मे महिन्यापासून पीएनबीने ग्राहकांना या सवलतीचा लाभ देणे बंद केले आहे.

दुसरीकडे, पेट्रोलियम मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) ही सुविधा बंद केल्याचे बँकेने म्हटले आहे. PNB वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (BPCL) ने माहिती दिली आहे की, तेल कंपन्यांनी (IOC, BPCL, HPCL) पेट्रोल पंपांवर डिजिटल मोडद्वारे इंधन खरेदीच्या पेमेंटवर 0.75 टक्के सवलत मागे घेतली आहे. पीएनबीकडून सांगण्यात आले की, मे महिन्यापासून ग्राहकांनी (Customers) या सवलतीचा लाभ देणे बंद केले आहे.

एनईएफटी, आरटीजीएसचे शुल्कही वाढले

यापूर्वी, NEFT, RTGS शुल्क देखील PNB ने वाढवले होते. बँकेने केलेला हा बदल 20 मे 2022 पासून लागू झाला आहे. PNB नुसार, ऑफलाइन व्यवहारांसाठी RTGS शुल्क 24.50 रुपये आणि ऑनलाइन व्यवहारांसाठी 24 रुपये करण्यात आले आहे, पूर्वी शाखा स्तरावर ऑफलाइन व्यवहारांसाठी RTGS साठी 20 रुपये होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com