Bank News: 'या' 3 बँकांमध्ये अकाऊंट असलेल्या करोडो ग्राहकांना मोठा झटका, नियमात झाला बदल!

Bank Latest News: बँकेकडून वेळोवेळी अनेक निर्णय घेतले जातात, ज्याचा थेट परिणाम देशातील करोडो ग्राहकांवर होतो.
Bank
BankDainik Gomantak
Published on
Updated on

Bank MCLR Rates: बँकेकडून वेळोवेळी अनेक निर्णय घेतले जातात, ज्याचा थेट परिणाम देशातील करोडो ग्राहकांवर होतो. आता ICICI बँक, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. बँकेने MCLR चे दर वाढवले ​​आहेत. बँकेचे नवे दर 1 डिसेंबरपासून लागू झाले आहेत.

दर किती वाढले?

ICICI बँकेने MCLR दर 10 बेसिस पॉईंटने वाढवले ​​आहेत. बँकेच्या या निर्णयानंतर सर्व प्रकारची कर्जे महाग होणार आहेत. याशिवाय पीएनबी 0.05 टक्क्यांनी वाढला आहे. बँक ऑफ इंडिया 0.25 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.

Bank
Bank News: करोडो ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, RBI ने बँकांबाबत जारी केली ही यादी; लगेच पाहा

ICICI बँकेच्या दरांचे काय झाले?

खाजगी क्षेत्रातील ICICI बँकेचा (ICICI Bank) ओव्हरनाइट आणि एका महिन्याचा दर 8.05 टक्क्यांवरुन 8.15 टक्क्यांवर पोहोचला आहे. याशिवाय 3 महिन्यांचा दर 8.10 टक्क्यांवरुन 8.20 टक्के झाला आहे. जर 6 महिन्यांच्या दरांबद्दल बोलायचे झाल्यास, तो 8.35 टक्क्यांवरुन 8.40 टक्के झाला आहेत.

PNB नवीन दर

पंजाब नॅशनल बँकेच्या दरांबद्दल बोलायचे झाल्यास, ओव्हरनाइट दर 7.40 टक्क्यांवरुन 7.45 टक्के झाला आहे. त्याचवेळी, एक महिन्याचा दर 7.45 टक्क्यांवरुन 7.50 टक्के झाला आहे. जर 3 महिन्यांच्या दराबद्दल बोलायचे झाल्यास, 7.55 टक्क्यांवरुन 7.60 टक्के झाला आहे. 6 महिन्यांसाठी 7.80 टक्के आणि एका वर्षासाठी 8.10 टक्के दर आहे.

Bank
Banking News: 28 फेब्रुवारीनंतर या बँकेच्या IFSC कोडमध्ये होणार बदल!

बँक ऑफ इंडियाचे नवीन दर

बँक ऑफ इंडियाचे (Bank oF India) ओव्हरनाइचे दर 7.05 टक्क्यांवरुन 7.30 टक्क्यांवर पोहोचले आहेत. त्याचवेळी, एक महिन्याचा दर 7.40 टक्क्यांवरुन 7.65 टक्के झाला आहे. याशिवाय 3 महिन्यांच्या दराबद्दल बोलायचे झाल्यास, तो 7.45 टक्क्यांवरुन 7.70 टक्के झाला आहे. 6 महिन्यांच्या दराबद्दल बोलायचे झाल्यास, एका वर्षाचा दर 7.90 टक्के आणि 8.15 टक्के झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com