Banking News: 28 फेब्रुवारीनंतर या बँकेच्या IFSC कोडमध्ये होणार बदल!

बँकांचे विलीनीकरण झाले IFSC कोडमध्ये होणार बदल;जुने चेकबुक होणार अवैध
Banking
BankingDainik Gomantak
Published on
Updated on

Banking Update: लक्ष्मी विलास बँक आणि DBS बँक इंडिया लिमिटेडचे ​​जुने चेकबुक आणि IFSC कोड आता अवैध होतील. कारण या दोन्ही बँकांचे विलीनीकरण झाले आहे.यामुळे आता बँक शाखेचा जुना IFSC कोड आणि चेकबुक बदलणार आहे.

बँकेने 25 ऑक्टोबर 2021 पासून सर्व ग्राहकांना नवीन चेकबुक देण्यास सुरुवात केली परंतु, ग्राहकांच्या सोयीसाठी, जुने चेकबुक 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत वैध ठेवण्यात आले. परंतु, यानंतर ग्राहक जुन्या चेकबुकमधून पेमेंट करू शकणार नाही. (bank's IFSC code will be changed after February 28)

Banking
March Bank Holidays: मार्चमध्ये बॅंक व्यवहार होऊ शकतात ठप्प?

डीबीएस बँक इंडिया लिमिटेडने आपल्या ग्राहकांना ही माहिती दिली

या संदर्भात ग्राहकांना (Bank consumers) माहिती देताना बँकेने सांगितले आहे की 1 मार्च 2022 पासून जर तुम्ही पैसे ट्रान्सफर करण्यासाठी IMPS, NEFT किंवा RTGS वापरत असाल तर तुम्हाला नवीन IFSC कोड वापरावा लागेल. डीबीआयएलने बँक ग्राहकांना मेसेज आणि ईमेलसह पत्र पाठवून याची माहिती दिली आहे. बँकेने नवीन चेकबुक घेण्याचे आवाहन केले आहे आणि बँकेचा नवीन IFSC कोड लोकांना शेअर करण्याचा सल्ला दिला आहे.

नवीन IFSC कोड आणि MICR कोड कसे तपासायचे

नवीन (IFSC) कोड आणि MICR कोड तपासण्यासाठी, तुम्ही https://www.lvbank.com/view-new-ifsc-details.aspx या वेबसाइटवर क्लिक करू शकता. येथे तुम्ही तुमचे राज्य आणि शहर निवडा. यानंतर तुम्हाला तुमच्या बँक (Bank) शाखेच्या IFSC कोड आणि MICR कोडबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. लक्ष्मी विलास बँकेचे 27 नोव्हेंबर 2020 रोजी DBS बँकेत विलीनीकरण करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com