Bank Holidays December 2022: तुम्ही बँकेत जाण्याचा विचार करत असाल तर त्याआधी तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे की, डिसेंबर महिन्यात बँक किती दिवस बंद राहणार आहे. डिसेंबर महिन्यात 31 पैकी 13 दिवस बँका काम करणार नाहीत. बँकांच्या सुट्ट्यांची यादी रिझर्व्ह बँकेने जारी केली आहे. कोणत्या दिवशी बँकांमध्ये काम होणार नाही ते जाणून घ्या...
आरबीआयने यादी जारी केली
रिझर्व्ह बँकेकडून बँकांच्या सुट्ट्यांची यादी जारी केली जाते. ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या सुविधा लक्षात घेऊन RBI सुट्ट्यांची यादी अगोदर प्रसिद्ध करते, जेणेकरुन कोणतीही अडचण येऊ नये.
डिसेंबर बँक सुट्ट्यांची यादी 2022
>> 3 डिसेंबर - सेंट झेवियर्स फस्ट - गोव्यात बँक बंद
>> 4 डिसेंबर – देशभरात बँक बंद
>> 10 डिसेंबर - दुसरा शनिवार - देशभरात बँका बंद राहतील
>> 11 डिसेंबर - रविवारी देशभरात बँका बंद
>> 12 डिसेंबर- Pa-Tagan Nengminja Sangam - मेघालयात बँक बंद
>> 18 डिसेंबर- रविवारी देशभरातील बँक बंद
>> 19 डिसेंबर – गोवा मुक्ती दिन – गोव्यात बँक बंद
>> 24 डिसेंबर - ख्रिसमस आणि चौथा शनिवार - देशभरात बँक बंद
>> 25 डिसेंबर - रविवारी देशभरात बँका बंद
>> डिसेंबर 26- ख्रिसमस, लासुंग, नामसंग – मिझोराम, सिक्कीम, मेघालयात बँक बंद
>> 29 डिसेंबर - गुरु गोविंद सिंग जी यांचा जन्मदिन - चंदीगडमध्ये बँक बंद
>> 30 डिसेंबर- यू किआंग नांगवाह – मेघालयात बँक बंद
>> 31 डिसेंबर – नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला – मिझोराममध्ये बँक बंद
यादी पाहून नियोजन करा
या संपूर्ण यादीमध्ये राज्यनिहाय सुट्ट्यांचा समावेश आहे, त्यामुळे तुमच्या शहरातील सुट्टी पाहूनच बँकेत जाण्याचा प्लॅन करा. आयबीआय सुट्ट्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करते.
तुम्ही ऑनलाइन बँकिंग वापरु शकता
ग्राहक (Customer) इंटरनेट बँकिंग आणि UPI चा वापर करु शकतात. बँकांमध्ये काही सुट्ट्या राष्ट्रीय असतात, ज्या सर्व बँकांसाठी वैध असतात. पण अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक सुट्ट्याही असतात, या सुट्ट्या राज्यांच्या सणांवर अवलंबून असतात. राष्ट्रीय स्तराबद्दल बोलायचे झाल्यास, डिसेंबरमध्ये 3,4,10,11,18,24,25 रोजी बँका एकाच वेळी बंद राहतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.