PM Kisan: मोदी सरकार शेतकऱ्यांना देतेय 15 लाख रुपये, त्वरित करा अर्ज; जाणून घ्या

PM Kisan FPO Yojana: तुम्हालाही किसान योजनेचा लाभ मिळत असेल, तर आता तुमच्यासाठी आणखी एक मोठी बातमी आहे.
PM Kisan
PM Kisan Dainik Gomantak

PM Kisan FPO Yojana: तुम्हालाही किसान योजनेचा लाभ मिळत असेल, तर आता तुमच्यासाठी आणखी एक मोठी बातमी आहे. वास्तविक केंद्र सरकार शेतकऱ्यांवर मेहेरबान आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. आता सरकार शेतकऱ्यांना नवीन कृषी व्यवसाय सुरु करण्यासाठी 15 लाख रुपये देत आहे. तुम्ही या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता ते जाणून घ्या...

शेतकऱ्यांना 15 लाख मिळतील

शेतकऱ्यांच्या (Farmers) आर्थिक मदतीसाठी सरकारने (Government) 'पीएम किसान एफपीओ योजना' योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत शेतकरी उत्पादक संघटनेला 15 लाख रुपये दिले जाणार आहेत. नवीन कृषी व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 11 शेतकऱ्यांना मिळून एक संस्था किंवा कंपनी स्थापन करावी लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना कृषी उपकरणे, खते, बी-बियाणे किंवा औषधे खरेदी करणेही सोपे होईल.

PM Kisan
PM Kisan संबंधी मोठी अपडेट, या शेतकऱ्यांना मिळणार नाही 12 व्या हप्त्याचा लाभ

याप्रमाणे अर्ज करा

सर्व प्रथम राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.

आता होम पेजवर FPO च्या पर्यायावर क्लिक करा.

आता तुम्ही 'Registration' या पर्यायावर क्लिक करा.

आता तुमच्या समोर रजिस्ट्रेशन फॉर्म ची विंडो दिसेल.

आता फॉर्ममध्ये विचारलेली माहिती भरा.

यानंतर, तुम्ही स्कॅन केलेले पासबुक अपलोड करा किंवा चेक आणि आयडी प्रूफ अपलोड करा.

आता तुम्ही सबमिट पर्यायावर क्लिक करा.

PM Kisan
PM Kisan: आता पती-पत्नी दोघांनाही PM किसान योजनेंतर्गत मिळणार 6000 रुपये! जाणून घ्या

असे लॉग इन करा

तुम्हाला लॉग इन करायचे असल्यास, सर्वप्रथम राष्ट्रीय कृषी बाजाराच्या अधिकृत वेबसाइटवर जा.

आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.

यानंतर तुम्ही FPO च्या पर्यायावर क्लिक करा.

आता तुम्ही login च्या पर्यायावर क्लिक करा.

यानंतर तुमच्यासमोर लॉगिन फॉर्म उघडेल.

आता त्यात युजरनेम, पासवर्ड टाका.

याच्या मदतीने तुम्ही लॉग इन कराल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com