पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा गगनाला भडकले; पहा काय आहेत आजचे दर..

ऑक्टोबरमध्ये पेट्रोल 6.40 रुपयांनी महागले आहे. गेल्या 24 दिवसात डिझेल 7.70 रुपयांनी महाग झाले आहे. पेट्रोलपेक्षा डिझेल महाग झाले आहे.
Petrol-Diesel
Petrol-Diesel Dainik Gomantak
Published on
Updated on

आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी (Petroleum Company) पेट्रोलच्या दरात 35 पैशांनी तर डिझेलच्या दरात 35 पैशांनी वाढ केली आहे. मुंबईत एक लिटर पेट्रोलची किंमत 113 रुपये 46 पैसे प्रति लीटर झाली आहे. जगातील कमोडिटी मार्केटमध्ये कच्च्या तेलाची किंमत $ 85 पर्यंत पोहोचली आहे. याच कारणामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे.

आज वेगवेगळ्या शहरांमध्ये या पेट्रोल आणि डिझेल किंमती:

आज दर वाढल्यानंतर दिल्लीत पेट्रोल (Delhi Patrol) 107.59 रुपये, मुंबईत(mumbai) 113.46 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. चेन्नईमध्ये(Chennai) पेट्रोल 104.52 रुपये आणि कोलकातामध्ये 108.11 रुपये प्रति लीटर मिळत आहे. त्याचप्रमाणे भोपाळमध्ये पेट्रोलचा दर 116.26 रुपये आणि बंगळुरूमध्ये 111.34 रुपये प्रति लिटर आहे.

आज डिझेलचा दरही 35 पैशांनी वाढला आहे. आज दर वाढल्यानंतर दिल्लीत डिझेल 96.32 रुपये आणि मुंबईत 104.38 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. चेन्नईमध्ये डिझेल 100.59 रुपये आणि कोलकातामध्ये 99.43 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. भोपाळमध्ये (Bhopal) डिझेलचा दर 105.64 रुपये तर बंगळुरूमध्ये डिझेलचा दर 102.23 रुपये प्रतिलिटर आहे.

Petrol-Diesel
पेट्रोल-डिझेलच्या किंमती 'वाढता वाढता वाढे'...

डिझेल पेट्रोलपेक्षा महाग:

ऑक्टोबरमध्ये पेट्रोल 6.40 रुपयांनी महागले आहे. गेल्या 24 दिवसात डिझेल 7.70 रुपयांनी महाग झाले आहे. पेट्रोलपेक्षा डिझेल महाग झाले आहे. ब्रेंट क्रूडची किंमतही $0.92 वरून $85.53 प्रति बॅरल झाली आहे. WTI क्रूडची किंमत $1.09 वरून $82.50 पर्यंत वाढली आहे. गेल्या दोन वर्षांतील कच्च्या तेलाची ही सर्वाधिक किंमत आहे.

रोज सकाळी बदलतात दर

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. नवे दर सकाळी 6 पासून लागू आहेत. तथापि, अनेक वेळा दर दुसऱ्या दिवशीही सारखाच राहतो. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क,(Excise duty) डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते. सध्या सरकार पेट्रोलवर 32.90 रुपये प्रति लीटर उत्पादन शुल्क आणि डिझेलवर 31.80 रुपये प्रति लीटर शुल्क आकारत आहे.

आंतरराष्ट्रीय तेलाच्या (International oil) किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात, स्थानिक कर (VAT) आणि मालवाहतूक शुल्काच्या आधारे इंधनाच्या किमती राज्यानुसार बदलतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com