पेट्रोल-डिझेलच्या किंमती 'वाढता वाढता वाढे'...

देशातील तीन तेल विपणन कंपन्या एचपीसीएल (HPCL), बीपीसीएल (BPCL)आणि आयओसीनेही (IOC) बुधवारी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किंमतीत (Prices) वाढ जाहीर केली.
बुधवारी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किंमतीत वाढ जाहीर केली.
बुधवारी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किंमतीत वाढ जाहीर केली. Dainik Gomantak
Published on
Updated on

पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किंमती (Prices) गगनाला भिडत असल्याने, महागाईमध्ये होणाऱ्या वाढीमुळे सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत विक्रमी वाढ होत आहे. देशातील तीन तेल विपणन कंपन्या एचपीसीएल (HPCL), बीपीसीएल (BPCL)आणि आयओसीनेही (IOC) बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ जाहीर केली. आता दिल्लीत (Delhi) एक लिटर पेट्रोलची किंमत 35 पैशांनी वाढून 106.19 रुपये प्रति लीटर झाली आहे. त्याचबरोबर डिझेलचे दर 35 पैशांनी वाढून 94.92 रुपये प्रति लीटर झाले आहेत. तर मुंबईत (Mumbai) एक लिटर पेट्रोलची किंमत 35 पैशांनी वाढून 112.11 रुपये प्रति लीटर झाली आहे. डिझेलची किंमत 37 पैशांनी वाढून 102.89 रुपये प्रति लीटर झाली आहे.

बुधवारी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किंमतीत वाढ जाहीर केली.
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून पेट्रोल डिझेल झाले विमानाच्या दरापेक्षा महाग

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर तेव्हापासूनच लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.

पेट्रोल आणि डिझेल का होत आहे महाग

कोरोनानंतर व्यावसायिक कार्यात झपाट्याने वाढ झाल्यामुळे जगात ऊर्जेची मागणी वाढली आहे. त्यामुळेच कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, चीनमध्ये तापमान झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळेच कच्च्या आणि नैसर्गिक वायूची मागणी वाढली आहे.

बुधवारी पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किंमतीत वाढ जाहीर केली.
पेट्रोल-डिझेलचे दर भिडले गगनाला, जाणून घ्या कोणते वाहन चालवून पैसे वाचतील

तज्ञांचे म्हणणे आहे की, मागणी आणि पुरवठा शिल्लक हे दर्शविते की बाजारात पुरवठ्याची समस्या आहे. 2022 च्या सुरुवातीला बाजारात याच्या किमतीत आणखीन वाढ होऊ शकते. मात्र, मार्चअखेर क्रूड कमी होऊ शकते.

व्यापारी आणि विश्लेषकांनी सांगितले की, उत्तर गोलार्धात हिवाळा जवळ येत आहे कारण तापमान कमी होते आणि हीटिंगची मागणी वाढत आहे. त्यामुळेच तेल, कोळसा आणि नैसर्गिक वायूचे दर उच्च राहण्याची शक्यता आहे.

ब्राझीलमध्ये, सरकारी तेल कंपनी पेट्रोब्रासने सोमवारी रात्री उशिरा सांगितले की, नोव्हेंबरमध्ये क्रूडला "असामान्य मागणी" मिळाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com