PAN Card Rules Update: पॅन कार्डबाबत आयकर विभागाचा कडक नियम, साध्या चुकीमुळे भरावा लागू शकतो मोठा दंड; जाणून घ्या 'हे' 5 नियम

Pan Card Mandatory For Large Financial Transactions: सामान्यपणे पॅन कार्डचा वापर केवळ इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी किंवा बँक खाते उघडण्यासाठी केला जातो, असा अनेकांचा समज असतो.
PAN Card Rules Update
PAN Card Rules UpdateDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Pan Card Mandatory For Large Financial Transactions: सामान्यपणे पॅन कार्डचा वापर केवळ इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी किंवा बँक खाते उघडण्यासाठी केला जातो, असा अनेकांचा समज असतो. मात्र, देशातील अनेक मोठे आर्थिक व्यवहार करताना पॅन कार्ड देणे कायद्यानुसार अत्यंत अनिवार्य आहे. तुम्ही जमीन किंवा स्थावर मालमत्ता खरेदी करत असाल, महागडी गाडी घेत असाल किंवा शेअर बाजारात मोठी गुंतवणूक करत असाल, तर पॅन कार्डशिवाय तुमचे अनेक महत्त्वाचे व्यवहार रखडू शकतात.

आयकर विभाग पॅन नंबरच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रत्येक मोठ्या आर्थिक व्यवहारावर बारीक लक्ष ठेवून असतो, जेणेकरुन उत्पन्न (Income) आणि खर्चाचा ताळमेळ योग्य राखला जाऊ शकेल.

PAN Card Rules Update
DEADLINE ALERT! फक्त 31 डिसेंबरपर्यंत वेळ! लगेच करा 'हे' काम, नाहीतर तुमचं 'PAN Card' होईल बंद

प्राप्तिकर नियमांनुसार, काही ठराविक मोठ्या व्यवहारांसाठी पॅन कार्ड देणे बंधनकारक करण्यात आले. यामध्ये वीस लाख रुपयांपेक्षा अधिक मूल्याची कोणतीही प्रॉपर्टी खरेदी-विक्री करताना पॅन क्रमांक देणे आवश्यक आहे. याशिवाय, कोणत्याही एकाच व्यवहारात दोन लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे सामान किंवा सेवा खरेदी केल्यास, एक लाख रुपयांपेक्षा अधिकचे अनलिस्टेड शेअर्स विकत घेतल्यास किंवा विकल्यास आणि पाच लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीची चारचाकी अथवा दुचाकी वाहन खरेदी करताना पॅन कार्ड द्यावेच लागते. तसेच शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट खाते उघडतानाही पॅन अनिवार्य आहे.

PAN Card Rules Update
PAN Card Rule: गोवा सरकारचा मोठा निर्णय! सर्व प्रकारच्या नोंदण्यांसाठी पॅनकार्डचा नवीन नियम

जर तुम्ही यापैकी कोणत्याही मोठ्या व्यवहारात पॅन कार्ड देण्याचे टाळले, तर संबंधित कंपनी किंवा संस्था तुमच्यासोबत व्यवहार करण्यास नकार देऊ शकते. तुम्ही व्यवहारात दिलेला पॅन नंबर टीडीएस (TDS), टीसीएस (TCS), एसएफटी (SFT) आणि वार्षिक माहिती विवरणपत्र (AIS) यांसारख्या माध्यमातून थेट आयकर विभागापर्यंत पोहोचतो. जर तुमच्या जाहीर केलेल्या वार्षिक उत्पन्नात आणि मोठ्या खर्चांमध्ये मोठी तफावत आढळली, तर इन्कम टैक्स विभाग तुम्हाला नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागू शकतो.

PAN Card Rules Update
Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

याशिवाय, जर एखाद्याने जाणीवपूर्वक किंवा चुकीने खोटा पॅन क्रमांक दिला, तर आयकर नियमांनुसार त्याच्यावर तब्बल 10,000 रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही आर्थिक दस्तऐवजात पॅन नंबर भरताना नेहमी काळजी घ्यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.