ट्विटर यूजर निक्सने रचला इतिहास, लागोपाठ तिसऱ्यांदा ठरला अंदाज बरोबर; वाचा

द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) या एनडीएकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील असा बांधला होता.
Draupadi Murmu
Draupadi MurmuDainik Gomantak

ट्विटर यूजर्स असणाऱ्या निक्सचे भारताबाबतचे सलग तिसरे भाकीत खरे ठरले आहे. त्याने अलीकडेच द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) या एनडीएकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील असा बांधला होता. निक्सने 9 जून 2022 रोजी द्रौपदी मुर्मूबद्दल भविष्यवाणी केली होती. निक्स म्हणाला होता की, ''त्या एक सुशिक्षित महिला आणि अनुभवी आदिवासी नेत्या आहेत. त्याचबरोबर त्यांचीही पार्श्वभूमी RSS ची आहे.'' (twitter user niks creates history here are the three major predictions of his including nda candidate for president polls came true)

दरम्यान, भारताच्या आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना एनडीएकडून उमेदवारी देण्यात आली आहे. मंगळवारी त्यांच्या नावाची घोषणा होण्यापूर्वीच विरोधकांनी माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांना उमेदवार म्हणून घोषित केले होते. एनडीए (NDA) राष्ट्रपतीपदाचा कोणता उमेदवार उभा करणार याबाबत आधीच अटकळ सुरु होती. मुर्मू यांचेही नाव चर्चेत होते, पण निक्सने आधीच द्रौपदी मुर्मू एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार असतील असे ट्विट केले होते.

Draupadi Murmu
NDA च्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना केंद्राकडुन Z+ सुरक्षा

पहिल्या निक्सचे हे दोन अंदाज खरे ठरले

नीरज चोप्रा (Neeraj Chopra) ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देईल आणि आम्हाला अभिमान वाटेल अशी भविष्यवाणी निक्सने 27 ऑगस्ट 2018 रोजी केली होती. चोप्राने सुवर्णपदक जिंकण्याच्या तीन वर्षांपूर्वी निक्सने आपल्या फेसबुक पेजवर हा अंदाज व्यक्त केला होता. अखेरीस त्याची भविष्यवाणी खरी ठरली आणि ऑगस्ट 2021 मध्ये नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) 2020 मध्ये सुवर्ण जिंकून इतिहास रचला.

Draupadi Murmu
NDA कडून द्रौपदी मुर्मू भरणार राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी अर्ज उमेदवार

शिवाय, नीरज चोप्रा यांच्या आधी निक्स याने 2 फेब्रुवारी 2016 रोजी बिहारचे (Bihar) तत्कालीन राज्यपाल राम नाथ कोविंद (Ram Nath Kovind) हे एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील असे भाकीत केले होते. त्याचा अंदाजही खरा ठरला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com