OnePlus Nord 5 launch
OnePlus Nord 5 launchDainik Gomantak

OnePlus यूजर्सची प्रतीक्षा संपली! पॉवरफुल बॅटरी, शानदार फीचर्स अन् दमदार प्रोसेसरसह 'स्मार्टफोन' लॉन्च; जाणून घ्या किंमत

OnePlus ची नवीन Nord 5 सीरीज मिड रेंज सेगमेंटमधील ग्राहकांसाठी लॉन्च करण्यात आली.
Published on

OnePlus ची नवीन Nord 5 सीरीज मिड रेंज सेगमेंटमधील ग्राहकांसाठी लॉन्च करण्यात आली. कंपनीने या नवीन सीरीजमध्ये OnePlus Nord 5 आणि Nord CE 5 लॉन्च केले. या शानदार फोनच्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, हे दोन्ही फोन सोनी कॅमेरा सेन्सर, 80 वॅट सुपर फास्ट चार्जिंग, बेस्ट डिस्प्ले, शक्तिशाली बॅटरी आणि दमदार प्रोसेसर सारख्या वैशिष्ट्यांसह लॉन्च करण्यात आले आहेत. चला तर मग जाणून घेऊया या स्मार्टफोनसाठी तुम्हाला किती पैसे मोजावे लागतील?

OnePlus Nord CE 5 Specifications

चिपसेट: या वनप्लस स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 8350 प्रोसेसर वापरण्यात आला आहे.

डिस्प्ले: 120 फ्रेम्स प्रति सेकंद टच रिस्पॉन्स रेटसह येणाऱ्या या फोनमध्ये 6.77 इंचाची AMOLED स्क्रीन असेल. हा फोन 1400 निट्स पर्यंतच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो.

बॅटरी: 7100 एमएएचची शक्तिशाली बॅटरी देण्यात आली आहे, ज्याबद्दल कंपनीचा दावा आहे की, हा फोन एकदा चार्ज केल्यानंतर 2.5 दिवस चालतो. हा फोन 80 वॅट फास्ट चार्ज सपोर्टसह येतो.

कॅमेरा सेटअप: फोनच्या मागील बाजूस 50 मेगापिक्सेलचा सोनी प्रायमरी कॅमेरा आहे, तसेच, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा (Camera) आहे. सेल्फीसाठी फोनच्या पुढील बाजूस 16 मेगापिक्सेलचा कॅमेरा सेन्सर उपलब्ध असेल. या फोनला एआय सपोर्ट देखील मिळतो.

OnePlus Nord 5 launch
OnePlus लॉन्च करणार 'हा' पॉवरफूल गेमिंग स्मार्टफोन, मिळतील जबरदस्त फीचर्स

OnePlus Nord 5 Specifications

प्रोसेसर: या वनप्लस स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगन 8एस जनरेशन 3 प्रोसेसर आहे.

कॅमेरा: मागील बाजूस 50 मेगापिक्सेलचा सोनी एलवायटी 700 कॅमेरा सेन्सर असेल, तसेच, 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा असेल. याशिवाय, फोनच्या पुढच्या बाजूला 50 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा सेन्सर देखील देण्यात आला आहे.

डिस्प्ले: या फोनमध्ये 6.83 इंचाची एमोलेड स्क्रीन आहे, जी 1800 निट्स पीक ब्राइटनेस सपोर्ट देते जी 144 हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते.

बॅटरी: या फोनमध्ये 6800 एमएएचची शक्तिशाली बॅटरी आहे, जी 80 वॉट सुपरव्हीओसी फास्ट चार्जला सपोर्ट करते.

OnePlus Nord 5 Price in India

दरम्यान, या फोनच्या 8/128 जीबी, 12/256 जीबी आणि 12/512 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे 31999 रुपये, 34999 रुपये आणि 37999 रुपये आहे. सेलबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनचा सेल 9 जुलै रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होईल, हे दोन्ही वनप्लस स्मार्टफोन लॉन्च झाल्यानंतर कंपनीच्या अधिकृत साइट तसेच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अमेझॉनवर सेलसाठी उपलब्ध करुन दिले जातील. स्पर्धेबद्दल बोलायचे झाल्यास, या रेंजमध्ये हा फोन मोटोरोला एज 60 प्रो (किंमत 33999 रुपये) आणि नथिंग फोन ए प्रो (किंमत 33999 रुपये) शी स्पर्धा करेल.

OnePlus Nord 5 launch
OnePlus 13s: गेम चेंजर प्रोसेसर, मेगा बॅटरी अन्... वनप्लसचा 'हा' धमाकेदार स्मार्टफोन लॉन्च; अ‍ॅपल-सॅमसंगचं वाढलं टेन्शन

OnePlus Nord CE 5 Price in India

तसेच, या फोनचे 8 जीबी/128 जीबी, 8 जीबी/256 जीबी आणि 12 जीबी/256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट खरेदी करण्यासाठी तुम्हाला 24999 रुपये, 26999 रुपये आणि 28999 रुपये खर्च करावे लागतील. या हँडसेटची विक्री 12 जुलै रोजी अमेझॉन प्राइम डे सेल सुरु होताच सुरु होईल. या किमतीत हा फोन Realme GT6 (किंमत 27999 रुपये) आणि Vivo V50E (किंमत 28999 रुपये) ला कडक स्पर्धा देईल.

OnePlus Nord 5 launch
OnePlus 13 Series अखेर भारतात लॉन्च! 6000 mAh बॅटरी, दमदार प्रोसेसरसह सुसज्ज; जाणून घ्या किंमत

स्मार्टफोन्स कधी लॉन्च होणार?

Galaxy Z Fold 7 आणि Galaxy Z Flip 7 उद्या म्हणजेच 9 जुलै रोजी Samsung Galaxy Unpacked कार्यक्रमात लॉन्च केले जाऊ शकतात. याशिवाय, Motorola G96 देखील उद्या ग्राहकांसाठी लॉन्च केले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com