
OnePlus ची नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज – OnePlus 13 भारतात लॉन्च झाली आहे. लेटेस्ट सीरीजमध्ये OnePlus 13 आणि OnePlus 13R स्मार्टफोनचा समावेश आहे, जे शानदार फिचर्ससह लॉन्च करण्यात आले आहेत. स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटसह सुसज्ज OnePlus 13 व्यतिरिक्त, OnePlus Buds Pro 3 देखील लॉन्च करण्यात आला आहे. Apple Intelligence शी स्पर्धा करण्यासाठी, OnePlus च्या नवीन फोनमध्ये दमदार आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) फिचर्स असतील.
OnePlus 13 हा डिझाईन आणि परफॉर्मन्सच्या दृष्टीने पाहिल्यास शानदार आहे. कंपनीने हा स्मार्टफोन अनेक नवीन फीचर्ससह मार्केटमध्ये लॉन्च केला आहे. OnePlus 12 च्या तुलनेत तुम्हाला OnePlus 13 मध्ये अधिक दमदार अनुभव मिळेल. चला तर मग OnePlus 13 सीरीजसह OnePlus Buds Pro 3 चे फिचर्स आणि किंमत जाणून घेऊया...
फ्लॅगशिप OnePlus 13 स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेटसह लॉन्च करण्यात आला आहे, जो आतापर्यंतचा सर्वात पॉवरफुल प्रोसेसर आहे. यात 6000mAh ची पॉवरफुल बॅटरी आहे, जी पॉवर बॅकअपच्या बाबतीत खूपच उत्कृष्ट आहे. या फोनमध्ये IP69 आणि IP68 रेटिंग प्रोटेक्शन आहे.
Display: OnePlus 13 मध्ये LTPO 4.1 सह 6.82-इंच 120Hz ProXDR डिस्प्ले आहे. याचे रिझोल्यूशन 3168×1440 पिक्सेल (QHD+) असेल.
Chipset: OnePlus 13 ला Snapdragon 8 Elite चिपसेटचा सपोर्ट आहे, जो आजपर्यंतचा सर्वात पॉवरफुल फोन प्रोसेसर आहे.
Storage & OS: याची रॅम 12GB ते 24GB पर्यंत आहे, तर स्टोरेज 1TB पर्यंत देण्यात केले आहे. हा स्मार्टफोन Android 15 वर आधारित OxygenOS 15 OS वर चालतो. हा हँडसेट 4 वर्षांसाठी ओएस अपडेट आणि 6 वर्षांसाठी सिक्युरिटी अपडेटसह येतो.
Camera: हा फोन OIS Sony LYT-808 50MP फ्रंट कॅमेरासह येतो. एकूणच तुम्हाला 50MP+50MP+50MP ने सुसज्ज ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळेल. व्हिडिओ कॉल आणि सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Battery: स्मार्टफोनला पॉवर देण्यासाठी 6000mAh चा वापर करण्यात आला आहे, जो 100W SUPERVOOC फास्ट चार्जिंगसह चार्ज केला जाऊ शकतो.
12GB रॅम + 256GB: 69,999 रु
16GB रॅम + 512GB: रु 76,999
24GB रॅम + 1TB: रु 89,999
OnePlus 13R मध्ये OnePlus 13 सारखी काही फिचर्स आहेत. हा स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 3 चिपसेटच्या सपोर्टसह येतो. पॉवर बॅकअपसाठी, यात 6000mAh बॅटरी आहे. OxygenOS 15 OS OnePlus 13R मध्ये AI वापरण्यात मदत करेल. OnePlus ने OnePlus 13R ला 42,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केला आहे.
Display: या स्मार्टफोनमध्ये LTPO 4.1 सह 6.78 इंच 120Hz ProXDR डिस्प्ले आहे. नवीन फोनचे रिझोल्यूशन 2780×1264 पिक्सेल आहे.
Chipset: परफॉर्मेंससाठी, OnePlus 13R ला Snapdragon 8 Gen 3 चिपसेटचा सपोर्ट मिळेल, जो एक अतिशय दमदार मोबाइल प्रोसेसर मानला जातो.
Storage & OS: हा हँडसेट 12GB आणि 16GB रॅम सह येतो आणि 512GB पर्यंत स्टोरेज असेल. Android 15 वर आधारित OxygenOS 15 OS सह, ओएस अपडेट्स 4 वर्षांसाठी आणि सिक्युरिटी अपडेट्स 6 वर्षांसाठी उपलब्ध असतील.
Camera: फोटोग्राफीसाठी 50MP+50MP+8MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. 16MP फ्रंट कॅमेरा व्हिडिओ कॉल आणि सेल्फीसाठी देण्यात आला आहे.
Battery: पॉवर बॅकअपसाठी यामध्ये OnePlus 13 सारखी 6000mAh बॅटरी देखील आहे, ज्यामध्ये 80W SUPERVOOC फास्ट चार्जिंगचे फिचर्स आहे.
12GB रॅम + 256GB: रु 42,999
16GB रॅम + 512GB: रु 49,999
OnePlus 13 Series Sale: OnePlus 13 ची विक्री भारतात 10 जानेवारीपासून सुरु होणार असून OnePlus 13R 13 जानेवारीपासून खरेदी करता येईल.
Apple iPhone 16 सीरीजशी स्पर्धा करण्यासाठी, OnePlus ने OnePlus 13 सीरीज अधिक शानदार बनवण्यासाठी AI फिचर्स देण्यात आले आहेत. यात डीफॉल्ट AI सहाय्य म्हणून Google Gemini AI आहे, जे तुम्हाला AI डिटेल बूस्ट, AI अनब्लर, AI रिफ्लेक्शन इरेज आणि सर्कल टू सर्च सारख्या AI फिचर्सद्वारे शानदार AI अनुभव देईल. OnePlus 13 मध्ये फोटोग्राफीसाठी OnePlus Snapshot फीचर देण्यात आले आहे.
OnePlus 13, OnePlus 13R आणि OnePlus Buds Pro 3 खरेदी करुन तुम्ही मोठ्या सवलतींचा लाभ घेऊ शकता. OnePlus 13 सीरीच्या ओपन सेलमध्ये तुमची 12,000 रुपयांपर्यंत बचत होईल, तर OnePlus Buds Pro 3 च्या ओपन सेलमध्ये तुम्ही 4,000 रुपयांपर्यंत बचत करु शकता. एक्सचेंज बोनस आणि इन्स्टंट बँक डिस्काउंटद्वारे तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.