OnePlus लॉन्च करणार 'हा' पॉवरफूल गेमिंग स्मार्टफोन, मिळतील जबरदस्त फीचर्स

OnePlus Gaming Smartphone: वनप्लस लवकरच एक नवीन गेमिंग स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. हा गेमिंग फोन आसुस, नुबिया सारख्या ब्रँडच्या फ्लॅगशिप गेमिंग स्मार्टफोन्सना टक्कर देऊ शकतो.
OnePlus Gaming Smartphone
OnePlus Gaming SmartphoneDainik Gomantak
Published on
Updated on

वनप्लस आपल्या Nord मालिकेतील दोन नवीन स्मार्टफोन OnePlus Nord 5 आणि OnePlus Nord CE 5 येत्या ८ जुलै रोजी लॉन्च करणार आहे. या दोन्ही फोनमुळे मिड-रेंज सेगमेंटमध्ये स्पर्धा अधिकच तीव्र होणार आहे. याशिवाय, कंपनी एक नवा गेमिंग फ्लॅगशिप स्मार्टफोन देखील घेऊन येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

गेमिंग स्मार्टफोन

प्रसिद्ध टिपस्टर योगेश ब्रार यांनी त्यांच्या X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून दावा केला आहे की वनप्लस एक नवीन सब-ब्रँड किंवा सब-सिरीज तयार करत आहे, जी थेट गेमर्सला लक्षात घेऊन डिझाईन केली जात आहे. सध्या हा गेमिंग फोन संशोधन आणि विकासाच्या टप्प्यात असून, कधी लाँच होईल याची अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध नाही.

या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Elite फ्लॅगशिप प्रोसेसर दिला जाऊ शकतो, जो OnePlus 13 आणि OnePlus 13s मध्ये वापरण्यात आला होता. हा गेमिंग फोन Asus ROG Phone आणि Nubia Red Magic सारख्या गेमिंग स्मार्टफोनना थेट स्पर्धा देईल, अशी शक्यता आहे.

OnePlus Gaming Smartphone
Goa Politics: गावडेंच्या अडचणी वाढल्या! प्रियोळातच आव्‍हान; बेतकी-खांडोळा सरपंचांवर अविश्‍‍वास; इतर ठिकाणी हालचाली सुरू

अलीकडेच लॉन्च झालेला OnePlus 13s हा स्मार्टफोन प्रीमियम गेमिंग आणि मल्टीमीडिया वापरासाठी खास डिझाइन करण्यात आला आहे. यामध्ये 6.32 इंचाचा Pro XDR डिस्प्ले असून 120Hz रिफ्रेश रेट आणि 1600 निट्स पीक ब्राइटनेससह उत्कृष्ट व्हिज्युअल अनुभव देतो.

यामुळे गेमिंग, व्हिडिओ स्ट्रीमिंग किंवा स्क्रोलिंग करताना स्क्रीन अधिक स्मूद आणि शार्प वाटते. 12GB RAM आणि 512GB स्टोरेजमुळे हा फोन सहज मल्टीटास्किंगसाठी सक्षम ठरतो. याची 5850mAh क्षमतेची मोठी बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंगमुळे गेमिंग सेशन्समध्ये व्यत्यय येत नाही.

कॅमेर्‍याच्या बाबतीत, OnePlus 13s मध्ये मागील बाजूस 50MP OIS मुख्य कॅमेरा आणि 50MP टेलिफोटो कॅमेरा असून 2x ऑप्टिकल आणि 20x डिजिटल झूमसह फोटोग्राफी करता येते.

सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा आहे. ही सर्व वैशिष्ट्यं एकत्रितपणे OnePlus 13s ला ₹54,999 च्या किमतीत एक पॉवरफुल प्रीमियम स्मार्टफोन बनवतात, जो विशेषतः गेमिंग आणि उच्च दर्जाच्या मल्टीमीडिया अनुभवासाठी योग्य पर्याय ठरतो.

OnePlus Gaming Smartphone
Goa Politics: 'विचार न करता मतदान केले, तर उद्याचा गोवा आपल्यासाठी नसेल'! परब यांचा इशारा; विरोधकांसोबत जाण्याबाबत केले मोठे विधान

OnePlus कंपनी नेहमीच इनोव्हेशन आणि परफॉर्मन्स यावर लक्ष केंद्रित करत आले आहे. त्यामुळे आगामी Nord फोनसोबतच गेमिंग फ्लॅगशिपची घोषणा ही मोबाईल गेमिंग चाहत्यांसाठी एक मोठी संधी ठरू शकते. ८ जुलैला Nord 5 आणि Nord CE 5 चे लॉन्च होणार असून, त्याच वेळी OnePlus चा गेमिंग स्मार्टफोन देखील चर्चेचा विषय ठरणार आहे. मोबाईल गेमर्ससाठी ही वर्षाचा हायलाईट ठरणारी घोषणा असू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com