One Plus च्या रेन वॉटर टचसमोर आयफोन फिका, आता पावसातही बिनधास्त वापरा फोन

फोन कितीही वॉटरप्रूफ असला, तरी पाण्यात भिजलेली स्क्रीन वापरणे अवघडच असते. OnePlus च्या Ace 2 Pro फोनमध्ये तुम्हाला या समस्येवर उपाय मिळणार आहे.
Oneplus Introduces Rain Water Touch Feature In Its New Phone Which Beats Iphone:
Oneplus Introduces Rain Water Touch Feature In Its New Phone Which Beats Iphone:Dainik Gomantak
Published on
Updated on

Oneplus Introduces Rain Water Touch Feature In Its New Phone Which Beats Iphone:

स्मार्टफोनमध्ये आपण सतत अनेक बदल पाहत असतो. टेक कंपन्या फोल्ड फोनपासून ते सुपर फास्ट चार्जिंगपर्यंत अनेक नवनवीन शोध लावत आहेत, परंतु एक समस्या आहे ज्याची वनप्लसने दखल घेतली आहे. आपण पावसात फोन वापरण्याच्या समस्येबाबत बोलत आहोत. तुमचे फोन वॉटरप्रूफ असले तरी ते पावसात वापरणे अशक्य असते.

ही समस्या सोडवण्यासाठी अनेक कंपन्या काम करत आहेत. वास्तविक, पाऊस किंवा पाण्याने भिजलेली टच स्क्रीन प्रतिसाद देत नाही. या समस्येवर मात करण्यासाठी OnePlus ने एक नवीन स्क्रीन विकसित केली आहे, जी टच इनपुट चांगल्या प्रकारे हाताळते.

OnePlus Ace 2 Pro स्मार्टफोनमध्सये, कंपनी हे तंत्रज्ञान वापरु शकते. ज्याचे नाव Rain Water Touch फीचर असेल. जाणून घेऊया वनप्लसचे हे तंत्रज्ञान काय आहे आणि ते कसे काम करते.

रेन वॉटर टच म्हणजे काय?

9 To 5 Google च्या माहितीनुसार, OnePlus ने आपला आगामी स्मार्टफोन OnePlus Ace 2 Pro चायनीज सोशल मीडिया Weibo वर प्रदर्शित केला आहे. या मिडरेंज स्मार्टफोनमध्ये, नवीन स्क्रीन तंत्रज्ञान वापरले आहे, जे पाण्याने भिजलेल्या स्क्रीनवरही अचूक टच देते.

OnePlus Ace 2 Pro ची चाचणी कंपनीने iPhone 14 Pro सह केली आहे. Apple च्या या फोनचा स्क्रीन टच प्रतिसाद देत नव्हता, तर OnePlus चा फोन पावसातही व्यवस्थित काम करत होता.

Oneplus Introduces Rain Water Touch Feature In Its New Phone Which Beats Iphone:
Success Story: घरच्यांकडून पॉकेटमनी मागायच्या वयात, ड्रॉप आऊट तरुणाने उभारली 7300 कोटींची कंपनी

कसे काम करते हे तंत्रज्ञान?

कॅपेसिटिव्ह तंत्रज्ञानाचा वापर बहुतांश स्मार्टफोनमध्ये केला जातो, ज्याच्या मदतीने स्क्रीन तुमच्या बोटाचा स्पर्श ओळखते. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये इलेक्ट्रिकल कंडक्शनचा वापर केला जातो, ज्यावरून आपण स्क्रीनला कधी आणि कुठे स्पर्श केला आहे हे दर्शविते. ही प्रक्रिया खूप वेगवान आहे.

दुसरीकडे, स्क्रीन ओली असताना, पाण्यामुळे या प्रक्रियेवर परिणाम होतो. पाणी हे विद्युत वाहक असल्याने स्पर्श योग्य प्रकारे होत नाही.

Oneplus Introduces Rain Water Touch Feature In Its New Phone Which Beats Iphone:
Success Story: अवघ्या 25 व्या वर्षी युट्युबरने कमावले 800 कोटी

या समस्येवर मात करण्यासाठी कंपनीने कस्टम चिपचाही वापर केला आहे. OnePlus ने अद्याप Ace 2 Pro ला इतर मार्केटमध्ये लॉन्च करण्याची घोषणा केलेली नाही.

रिपोर्ट्सनुसार, कंपनी हे तंत्रज्ञान चीनच्या बाहेर आपल्या फोनमध्ये देऊ शकते. जागतिक बाजारपेठेत कंपनी OnePlus 12 मध्ये हे तंत्रज्ञान सादर करू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com