दूरसंचार कंपनी भारती एअरटेल या महिन्यापासून 5G सेवा सुरू करणार असल्याचे समोर आले आहे. मार्च 2024 पर्यंत देशातील सर्व शहरे आणि प्रमुख ग्रामीण भागात 5G सेवा सुरू करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे तसेच कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) गोपाल विट्टल यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली आहे. (Good news for Airtel customers 5G service to reach 5000 cities)
देशात मोबाईल सेवेची किंमत खूपच कमी असून ती वाढवण्याची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले. विट्टल म्हणाले की, "आमचा ऑगस्टपासून 5G सेवा सुरू करण्याचा मानस आहे तसेच लवकरच ते देशभरात पोहोचवले जाईल. आम्हाला विश्वास आहे की आम्ही मार्च 2024 पर्यंत देशातील प्रत्येक शहरामध्ये आणि प्रमुख ग्रामीण भागात 5G सेवा सुरू करू.
कंपनीच्या आर्थिक निकालांबद्दल बोलताना ते म्हणाले की, "खरं तर, देशातील 5,000 शहरांमध्ये नेटवर्क अंमलबजावणीसाठी तपशीलवार योजना पूर्णपणे तयार आहे तसेच कंपनीच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी अंमलबजावणी असणार आहे.
भारती एअरटेलने नुकत्याच संपलेल्या स्पेक्ट्रम लिलावात देशभरातील 3.5 GHz आणि 26 GHz बँडमध्ये 19,867.8 MHz फ्रिक्वेन्सी मिळवल्या आहेत. तसेच कंपनीने निम्न आणि मध्यम बँडमध्ये एकूण 43,040 कोटी रुपयांना स्पेक्ट्रम खरेदी केले आहेत.
कंपनीचा भांडवली खर्च सध्याच्या पातळीवरच राहील, असे विट्टल यांनी यावेळी सांगितले तसेच त्यांनी महागात स्पेक्ट्रम खरेदी करण्याच्या गरजेकडे दुर्लक्ष केले आणि 700 मेगाहर्ट्झ बँडचा विचार केला आहे. या बँडमधील स्पेक्ट्रममध्ये दूरसंचार सेवांसाठी इतर बँडच्या तुलनेत कमी मोबाइल टॉवर स्थापित करणे आवश्यक असणार आहे.
"आमच्या प्रतिस्पर्ध्यांकडे मोठ्या प्रमाणात मध्यम बँड स्पेक्ट्रम नाही आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात मौल्यवान मिडल बँडमध्ये स्पेक्ट्रम नसता, तर 700 मेगाहर्ट्झ बँडमध्ये स्पेक्ट्रम मिळवण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नसतो.
विट्टल म्हणाले की कंपनीकडे 900 MHz स्पेक्ट्रम बँड आहे आणि त्या तुलनेत 700 MHz बँडला नेटवर्ककडून कोणतेही अतिरिक्त कव्हरेज मिळत नाहीये. ते म्हणाले की Airtel ची मासिक सरासरी कमाई प्रति ग्राहक (ARPU) 183 रुपये आहे आणि लवकरच दर वाढीसह 200 रुपये आणि अखेरीस 300 रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.