OLA CEO भाविश अग्रवाल भारताचे एलोन मस्क बनू शकतात का?

भाविश अग्रवाल खूप महत्वकांक्षी, मेहनती आणि जिद्दी स्वभावाचे उद्योजक आहेत.
OLA CEO भाविश अग्रवाल भारताचे एलोन मस्क बनू शकतात का?
Published on
Updated on

Ola Electric: येणारा काळ हा इलेक्ट्रिक वाहनांचा आहे. भारतासह परदेशातील अनेक ऑटोमोबाईल कंपन्या ईव्ही वाहन क्षेत्रात प्रवेश करत आहेत. भारतात ओला इलेक्ट्रिक कंपनी, इलेक्ट्रिक टू व्हीलर मार्केटमध्ये वेगाने पुढे जात आहे. ओला कंपनीचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल (Bhavish Agrawal) अलिकडेच ओलाच्या फ्युचर फॅक्टरीत पोहोचले. जगातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक टू व्हीलर प्लांटला त्यांनी यावेळी भेट दिली.

भाविश अग्रवाल हे ओला कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. भाविश अग्रवाल यांनी आयआयटी बॉम्बेमधून संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी या विषयात बीटेक केले आहे. भाविश अग्रवाल यांनी 2010 मध्ये मायक्रोसॉफ्टची नोकरी सोडून ओला या कॅब सुविधा देणऱ्या कंपनीची स्थापना केली. भाविश अग्रवाल खूप महत्वकांक्षी, मेहनती आणि जिद्दी स्वभावाचे उद्योजक आहेत.

OLA CEO भाविश अग्रवाल भारताचे एलोन मस्क बनू शकतात का?
PM Kisan Sammelan: PM मोदींची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; 'मोदी जी ने जीत लिया दिल'

प्रतिस्पर्धी उबेरला मागे टाकत ओला पुढे गेली यावरून अग्रवाल यांच्या जिद्दी स्वभावाचा अंदाज लावता येतो. भाविश अग्रवाल यांना एलोन मस्क यांच्या टेस्ला इंक आणि चीनच्या BYD Co.Ltd या इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांना मागे टाकत पुढे जायचे आहे.

भारत हा जगातील सर्वात मोठा दुचाकी उत्पादक देश आहे. आणि सर्वात मोठी जागतिक बाजारपेठ देखील आहे. रिसर्च अँड मार्केट्सच्या मते, या दशकाच्या अखेरीस भारत इलेक्ट्रिक टू व्हीलरसाठी 150 अब्ज डॉलरची बाजारपेठ होऊ शकते. म्हणजेच आता बाजारपेठेच्या 400 पट अधिक मोठी बाजारपेठ असेल.

OLA CEO भाविश अग्रवाल भारताचे एलोन मस्क बनू शकतात का?
Aadhar Update: आधार क्रमांकाशी ई-मेल आयडी लिंक करा आणि गैरवापर टाळा

टेस्लाची सर्वात स्वस्त कारची किंमत सुमारे 50 हजार डॉलर्स एवढी आहे. प्रत्येकाला ही कार परवडेल असे नाही. येथेच ओलाला 1 हजार ते 50 हजार डॉलर्सच्या पर्यायासह इलेक्ट्रिक वाहन विभागात नेतृत्व करण्याची संधी आहे. ट्रॅक्शन टेक्नॉलॉजीच्या सर संस्थापक नेहा सिंग यांच्या मते, भावीश अग्रवाल यांच्या ओला इलेक्ट्रिक व्हेईकल कंपनीला भारतीय बाजारपेठेत अधिक सक्षम होण्यासाठी अजून बरेच काम करावे लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com