PM Kisan Sammelan: PM मोदींची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; 'मोदी जी ने जीत लिया दिल'

Prime Minister Narendra Modi: किसान समृद्धी केंद्र हे केवळ शेतकऱ्यासाठी खतांच्या खरेदी-विक्रीचे केंद्र नाही, तर हे एक केंद्र आहे, जे शेतकऱ्याला जोडते.
Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

PM Kisan Samman Sammelan: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा देशातील 600 हून अधिक प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र सुरु करुन देशातील शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. कार्यक्रमादरम्यान पीएम मोदी म्हणाले की, 'किसान समृद्धी केंद्र हे केवळ शेतकऱ्यासाठी खतांच्या खरेदी-विक्रीचे केंद्र नाही, तर हे एक केंद्र आहे, जे शेतकऱ्याला जोडते. त्याला प्रत्येक गरजेमध्ये मदत करते.' यापूर्वीही केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत.

किसान सन्मान संमेलनात काय खास आहे?

पंतप्रधान मोदींनी आज नवी दिल्लीतील (New Delhi) भारतीय कृषी संशोधन संस्थेत आयोजित किसान सन्मान संमेलन 2022 चे उद्घाटन केले आणि कृषी स्टार्टअप कॉन्क्लेव्ह आणि प्रदर्शनाचा आढावाही घेतला. केंद्र सरकारही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांना नफा मिळवून देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. आता सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. शेतकरी समृद्धी केंद्रातून आता वन नेशन वन फर्टिलाइजर कार्यक्रमांतर्गत भारत ब्रँडचे खत खरेदी करु शकणार आहेत.

Prime Minister Narendra Modi
PM Kisan: शेतकऱ्यांचे बल्ले-बल्ले, 12 वा हप्ता खात्यात झाला जमा; त्वरित तपासा

दुसरीकडे, देशातील 3.3 लाखांहून अधिक किरकोळ खतांची दुकाने 600 हून अधिक प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्रांमध्ये शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी PMKSK मध्ये रुपांतरित केली जातील. या खास प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) म्हणाले की, 'ही अशी केंद्रे असतील जिथे केवळ खतच उपलब्ध होणार नाही, तर बियाणे, उपकरणे, माती परीक्षण, शेतकऱ्याला (Farmers) आवश्यक असलेली कोणतीही माहिती या केंद्रांवर एकाच ठिकाणी उपलब्ध असेल.'

Prime Minister Narendra Modi
PM Kisan: लाखो शेतकऱ्यांना मिळणार दिवाळी भेट, या दिवशी खात्यात येणार 12 वा हप्ता

सरकारचे मोठे पाऊल

आता प्रश्न असा आहे की, किसान समृद्धी केंद्रांमध्ये शेतकऱ्यांना काय लाभ मिळणार? याठिकाणी शेतकऱ्यांना शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार असून, त्यांचे प्रबोधनही करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची सोय लक्षात घेऊन, शेतकरी समृद्धी केंद्रे कृषी बाजारांच्या आसपास असतील जेणेकरुन शेतकरी तिथे सहज पोहोचू शकतील. एवढेच नव्हे तर या केंद्रांवर कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ शेतकऱ्यांना सल्ला देऊन कृषी उत्पन्न वाढवण्यास मदत करतील. शेतकऱ्यांना योग्य सल्ला आणि संबंधित माहिती देण्यासाठी हा कार्यक्रम दर महिन्याला किंवा 15 दिवसांतून एकदा आयोजित केला जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com