Indian Railways Whatsapp Food Service: आता व्हॉट्सअ‍ॅपवरून मागवा खाद्यपदार्थ, रेल्वेने सुरू केली ऑनलाइन सेवा

भारतीय रेल्वेने अलीकडेच रेल्वे प्रवाशांसाठी ई-खानपान सेवेच्या माध्यमातून खाद्यपदार्थ मागविण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप संपर्क सुरू केला आहे.
Indian Railways
Indian RailwaysDainik Gomantak
Published on
Updated on

रेल्वेतून प्रवास करताना आता तुम्हाला थेट व्हॉट्सअ‍ॅपवरून खाद्यपदार्थ मागवता येणार आहेत. यासाठी भारतीय रेल्वेने ई-कॅटरिंग अ‍ॅप फूड ऑन ट्रॅकच्या माध्यमातून ई-खानपान सेवा सुरू केली आहे.

भारतीय रेल्वेने अलीकडेच रेल्वे प्रवाशांसाठी ई-खानपान सेवेच्या माध्यमातून खाद्यपदार्थ मागविण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप संपर्क सुरू केला आहे. या नंबरच्या माध्यमातून प्रवाशांना खाद्यपदार्थ मागवता येणार आहेत. तसेच, आयआरसीटीसी)विकसित केलेल्या विशेष www.catering.irctc.co.in या संकेतस्थळाच्या माध्यामातून देखील खाद्यपदार्थ मागवता येतील.

Indian Railways
Watch Video: ऑटोरिक्षा? अंह आलिशान कार! पाहा भारतीय 'जुगाड'चा गजब व्हिडिओ

सुरुवातीला, व्हॉट्सअ‍ॅप संपर्कांद्वारे ई-खानपान सेवांची दोन टप्प्यांत अंमलबजावणी करण्याची योजना आहे. पहिल्या टप्प्यात www.ecatering.irctc.co.in या दुव्यावर क्लिक केल्यानंतर ई-कॅटरिंग सेवा निवडण्यासाठी ई-तिकीट बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना बिझनेस व्हॉट्सअ‍ॅप नंबर संदेश पाठवला जाईल.

ग्राहकांना अ‍ॅप डाउनलोड न करताही थेट आयआरसीटीसीच्या ई-खानपान संकेतस्थळाच्या माध्यमातून रेल्वेस्थानकाच्या मार्गावर उपलब्ध असलेल्या त्यांच्या पसंतीच्या रेस्टॉरंटमधून आवडीच्या खाद्यपदार्थांची मागणी करता येईल.

Indian Railways
CRZ नियमांचे उल्लंघन करण्यात गोवा देशात अव्वल, पाच वर्षांत 974 प्रकरणे आली उजेडात

सुरुवातीला, निवडक रेल्वेगाड्या आणि प्रवाशांच्या ई-खानपान सेवेसाठी व्हाट्स अप संपर्क सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आणि ग्राहकांचे अभिप्राय आणि सूचनांच्या आधारे, रेल्वे इतर गाड्यांमध्येही ही सुविधा सुरु केली जाणार आहे.

कोणता व्हॉट्सअ‍ॅप नंबर आहे?

भारतीय रेल्वेने खाद्यपदार्थ मागविण्यासाठी +91-8750001323 हा बिझनेस व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक सुरू केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com