Watch Video: ऑटोरिक्षा? अंह आलिशान कार! पाहा भारतीय 'जुगाड'चा गजब व्हिडिओ

एका साध्या दिसणाऱ्या ऑटोरिक्षाला लक्झरी कारसारखे डिझाइन करण्यात आले आहे, हे जुगाड पाहिल्यानंतर अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.
Viral Video
Viral VideoDainik Gomantak

भारतात जुगाड हा काही नवा विषय नाही अनोखी शक्कल लढवून विविध प्रयोग भारतातील लोक नेहमीच करत असतात. असे विविध व्हिडिओ आरपीजी एंटरप्रायझेसचे चेअरमन हर्ष गोयंका आपल्या ट्विटर हँडलवर शेअर करत असतात. गोयंका यांचे विविध मनोरंजक व्हिडिओ, लोकांना खूप आवडतात.

अलीकडेच, त्यांनी जुगाडचा एक जबरदस्त व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये एका साध्या दिसणाऱ्या ऑटोरिक्षाला लक्झरी कारसारखे डिझाइन करण्यात आले आहे, हे जुगाड पाहिल्यानंतर अनेकजण आश्चर्यचकित झाले आहेत.

Viral Video
Chiplun Mahotsav: पर्यटन, लोककला & कोकणी खाद्य महोत्सव! चिपळूणमध्ये 8 फेबुवारीपर्यंत भरगच्च कार्यक्रम

हर्ष गोयंका यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये, एक ऑटोरिक्षा दिसत आहे. ही ऑटोरिक्षा लक्झरी कार सारखी सुंदर डिझाइन केली गेली आहे, ज्यामध्ये मागील बाजूस अधिक सीट जोडण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये दिसणारा ही ऑटो पूर्णपणे उघडी आहे. ऑटोरिक्षा दिसायला प्रीमियम आणि आलिशान दिसत आहे. ही अद्भूत ऑटो पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

हा व्हिडिओ उद्योगपती हर्ष गोएंका यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला आहे. 'जर विजय मल्ल्याला कमी खर्चात तीन चाकी टॅक्सी डिझाईन करायची असती तर.' असे कॅप्शन व्हिडिओला गोएंका यांनी दिले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 18 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत, तर 400 जणांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.

Viral Video
Pakistan Crisis: कंगालीतही पाकिस्तानचा 'काश्मीरी राग', PM शरीफ यांचं POK बाबत मोठं वक्तव्य

व्हिडीओवर नेट युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'भाईने अप्रतिम ऑटो बनवला आहे. यामध्ये एकदा प्रवास करायला पाहिजे. असे एका यूजरने लिहिले आहे. ' दुसर्‍या युजरने लिहिले की, 'ही ऑटो फारच छान आणि रॉयल दिसत आहे.' अनेक गोष्टींना चांगला आकार देण्यात आपण भारतीय सर्वोत्कृष्ट आणि प्रशंसनीय आहोत. तर, तिसऱ्या यूजरने लिहिले, 'व्वा! यामुळे भारतीय रस्ते किती ग्लॅमरस दिसतील!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com