प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील मणिगाची पोलीस स्टेशन परिसरातून त्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुण राकेश कुमार मिश्रा याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दरभंगा पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे. त्या तरुणाची मुंबई पोलीसांकडून चौकशी केली जाणार आहे.
याला दुजोरा देताना दरभंगाचे एसएसपी आकाश कुमार यांनी सांगितले, राकेश कुमार मिश्रा असे या तरुणाचे नाव आहे. तो मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. अटक केलेल्या मुंबई पोलिसांनी त्याला सोबत नेले आहे. पुढील कारवाई मुंबई पोलिसांनाच करायची आहे.
मणिगाची येथील ब्रह्मपुरा गावातील रहिवासी सुनील कुमार मिश्रा यांचा मुलगा राकेश कुमार मिश्रा याला बुधवारी मुंबई पोलिसांनी अटक केल्याचे सांगितले जात आहे. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास पोलीस साध्या गणवेशात राकेशच्या घरी पोहोचले. त्यावेळी घराचा मुख्य दरवाजा बंद होता. पोलिसांनी दरवाजा ठोठावला, आरोपी राकेशने घराचा दरवाजा उघडला.
पोलिसांनी राकेशच्या मोबाईलवर कॉल केला. हा कॉल राकेशला आला आणि पोलिसांनी राकेशला अटक केली. विशेष म्हणजे बुधवारी एका अज्ञात व्यक्तीने सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये फोन करून हॉस्पिटल (Hospital) उडवून देण्याची धमकी दिली. फोन करणाऱ्या व्यक्तीने मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही धमकी दिली.
मुंबई पोलिसांनी सांगितले होते की, "आज म्हणजेच (बुधवार) दुपारी 12.57 वाजता सर एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलच्या लँडलाइन नंबरवर एका अनोळखी नंबरवरून कॉल आला ज्यामध्ये कॉलरने हॉस्पिटल आणि अंबानी कुटुंबातील काही सदस्यांना उडवून देण्याची धमकी दिली. नावाने पोलिसांनी डीबी मार्ग पोलिस ठाण्यात एफआयआर (FIR) नोंदवला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.